
मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाला आहे. ॲट्रॉसिटी कायदा (Atrocities Act) वापरुन दाखल गुन्ह्यांबाबत ‘ब्राह्मण एक्य परिषद’ परिषदेत मंचावरुन केलेल्या वक्तव्यावरुन ती वादात सापडली आहे. प्रेमनाथ जगतकर यांनी गुरुवारी (29 फेब्रुवारी) परळी शहर, बीड येथे दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम 295 (अ) तसेच कलम 505 (2) अन्वये केतकी आणि कार्यक्रमाचे संयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद 5 फेब्रुवारी रोजी पार पडली. या वेळी केतकी हिने केलेले वक्तव्य आक्षेपार्ह भोवले आहे.
अॅट्रोसिटी प्रकरणांची चौकशी व्हावी
केतकी चितळे हिने 25 फेब्रुवारी रोजी परळी येथे झालेल्या ‘ब्राह्मण एक्य परिषद’ परिषदेत सहभाग घेतला. तिने आरोप केला की एससी/एसटी कायद्यांतर्गत खोटे खटले दाखल करणे हा एक फायदेशीर व्यवसाय बनला आहे. गेल्या 5 वर्षांपासून अशा सर्व प्रकरणांची सर्वसमावेशक चौकशी करण्यात यावी. पुढे बोलताना अभिनेत्री म्हणाली, "गेल्या पाच वर्षात किती अॅट्रोसिटी केस आहेत. त्यातल्या ब्राह्मणांच्या विरोधात किती आहेत आणि प्रत्येक जातीविरोधात किती आहेत हे शोधा. हे अख्ख रॅकेट आहे. ज्याबद्दल तुम्हाला कल्पनाही नाही. एक वकीलांनी गेल्या 15-20 वर्षात 62 अॅट्रॉसिटी केसेस टाकल्या आहेत. यातील 13-15 ठिकाणी त्याच्यांसोबत विटनेस एकच आहे. असे अनेक वकील आहेत. हे अख्ख रॅकेट असून त्यांचं जोरात काम सुरू आहे. त्यामुळे अॅट्रोसिटी कायदा रद्द करावा", अशी मागणीही तिने केली होती. (हेही वाचा, Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे विरोधात दलित, मराठा बांधव आक्रमक; ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी)
या आधीही गुन्हा दाखल
केतकी चितळे हिच्याविरोधात शुक्रवारी (1 मार्च) भारतीय दंड संहिता (IPC) कलम 295A (धार्मिक भावना दुखावणे) आणि 502(2) (वर्गांमधील वैर) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र, या प्रकरणी अद्याप तिला अटक करण्यात आलेली नाही. उल्लेखनीय म्हणजे, केतकी चितळे हिला 2022 मध्ये कायद्याने अटक केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी पोस्ट केल्याचा आरोप होता. त्यानंतर तिला अटक झाली होती आणि तिने एक महिन्यापेक्षाही अधिक काळ तुरुंगात घालावावा लागला होता. (हेही वाचा,Ketaki Chitale Case: अभिनेत्री केतकी चितळेचा पोलीस कोठडीत विनयभंग; म्हणाली, 'मला मारहाण करून माझ्यावर विषारी शाई फेकण्यात आली' )
केतकी चितळे हिच्यावर गुन्हा तर दाखल झाल आहे. मात्र, तिला अद्याप अटक झाली नाही. त्यामुळे पोलीस पुढील कारवाई करतात याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, तिच्यावर एकाच ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे की, याच प्रकरणात इतरही काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत, याबाबत माहिती मिळू शकली नाही.