रायगड मधील महाड येथे एक 5 मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आता एनडीआरएफ कडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या दुर्घटनेप्रकरणी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान आता बचाव कार्य सुरु झाले असून या प्रकरणी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.(Mahad Building Collapse: रायगड जिल्ह्यातील महाड येथे 5 मजली इमारत कोसळली; 15 लोकांना वाचवण्यात यश, 200 हून अधिक लोक अडकल्याची भीती Video)
रिपोर्टनुसार, पाच मजली इमारतीत जवळजवळ 45 ते 50 फ्लॅट होते. त्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक राहत होते. या दुर्घटनेनंतर 22 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्याचसोबत जखमी नागरिकांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचसोबत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.(Building Collapses in Mahad: रायगड जिल्ह्यात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेप्रकरणी NDRF च्या पथकाने शक्य तेवढी मदत करावी- अमित शहा)
#UPDATE One dead and seven injured in the building collapse incident: Raigad Police#Maharashtra https://t.co/qKyJdHuJUz
— ANI (@ANI) August 24, 2020
महाड दुर्घटनेनंतर तळेगाव दाभाडे येथून एनडीआरएफच्या 3 टीम घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही इमारत नक्की कशामुळे कोसळली याबाबत माहिती मिळू शकली नाही.तर तारीक गार्डन असे या इमारतीच नाव आहे. इमारतीचे दाेन पिलर कमकुवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे, तसेच या इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे थानिकांचे म्हणणे आहे. ही इमारत मुंबईतील दाेन बांधकाम व्यावसायिकांनी बांधली असल्याचे बोलले जात आहे.