कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा (BS Yediyurappa) यांच्या समर्थकाने आत्महत्या केली आहे. येडीयुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा नुकताच राजीनामा दिला. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (BS Yediyurappa Resignation) दिल्याच्या नैराश्येतून या समर्थकाने सोमवारी (26 जुलै) आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव रवी असे आहे. 48 वर्षे वयाचा हा व्यक्ती कर्नाटक राज्यातील चमराजनगर (Chamarajanagar) येथील राहणारा आहे. रवी यास त्याच्या मित्र वर्तूळातून राजाहुळी म्हणून ओळखले जात असे. राजाहुळी हा शब्द कर्नाटकात अनेक लोक येडीयुरप्पा यांच्यासाठी अत्यंत प्रेमाणे वापरतात.
रवी नामक कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर येडीयुरप्पा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. येडीयुरप्पा यांनी आपल्या मात्रभाषेत (कन्नड) ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राजकारणात अनेक निर्णय घ्यावे लागतात. राजकारणामध्ये चढ-उतार स्वाभाविक असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. रवी याच्या आत्महत्येमुळे मला प्रचंड दु:ख झाले आहे. आपल्या जाण्यामुळे आपल्या कुटुंबावर आघात होतो. कुटंब शून्यात जाते. त्यामुळे कोणीही असे पाऊल उचलू नका, असे येडीयुरप्पा यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, BS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय')
ನನ್ನ ರಾಜೀನಾಮೆಯಿಂದ ಮನನ್ನೊಂದ ಗುಂಡ್ಲುಪೇಟೆ ತಾ॥ ಬೊಮ್ಮಲಾಪುರದ ರಾಜಪ್ಪ (ರವಿ) ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಶರಣಾದ ಸುದ್ದಿ ಅತೀವ ನೋವು ಹಾಗೂ ಬೇಸರ ತರಿಸಿದೆ.ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಏರಿಳಿತಗಳು ಸಹಜ ,ಇದಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾಣಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಮುಂದಾಗುವುದು ಸರ್ವಥಾ ಒಪ್ಪಲಾಗದು, ಇದರಿಂದ ಕುಟುಂಬಕ್ಕಾಗುವ ನಷ್ಟ ಯಾರಿಂದಲೂ ಭರಿಸಲಾಗದು.(1/2)
— B.S. Yediyurappa (@BSYBJP) July 27, 2021
राजकीय वर्तुळात जवळपास एक महिन्यापासून येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती. अखेर प्रदीर्घ उत्सुकते नंतर येडीयुरप्पा यांनी खरोखरच राजीनामा दिला आहे. येडीयुरप्पा यांनी काल (26 जुलै) दुपारनंतर आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. बीएस येडीयुरप्पा हे भाजपचे कर्नाटक राज्यातील जुने-जाणतने नेते आहेत. शिक्रापुरा मतदारसंघातून (Shikaripura Assembly) 1983 मध्ये पहिल्यांदा निवडूण आले. तेव्हापासून ते सातत्याने भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून ओळखले जात आहेत. या आधीही ते कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. आता त्यांची दुसरी टर्म होती परंतू, आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच येडीयुरप्पा यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.