कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई शहरातील 381 ठिकाणं BMC कडून कंटेनमेंट झोन म्हणून घोषित; पहा संपूर्ण यादी
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आज 162 नवे रुग्ण आढळल्याने राज्यात 1297 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 857  रुग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोरोना व्हायरस रुग्ण आढळलेली ठिकाणं, हॉस्पिटल्स सील करण्यात  आलं असून त्या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण आढळलेली वरळी कोळीवाडा, धारावी यांसारखी दाट लोकवस्ती असलेली मुंबईतील ठिकाणी सील करण्यात आली असून ती 'कंटेनमेंट झोन' (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मुंबईतील कंटेनमेंट झोनची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिकेने शहरातील तब्बल 381 ठिकाणं कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. धारावी येथील कंटेनमेंट झोनमध्ये फळ-भाजी विक्रीसह, फेरीवाल्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा दारोदारी जावून करण्यात येणार आहे. (मुंबई: Wockhardt, Jaslok पाठोपाठ Hinduja Khar, Spandan, Breach Candy, Bhatia Hospital मध्ये मेडिकल कर्मचार्‍यांना कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रूग्णांसाठी नियमित सेवा बंद)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीएमसी 1 लाख Rapid Test Kits ची निर्मिती करणार आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्णांचा तपास लवकर लागण्यास मदत होणार आहे. तसंच कंटेनमेंट झोन घोषित केलेल्या ठिकाणी कोरोना व्हायरसची तपासणी करण्यासाठी स्क्रिनिंग क्लिनिकही उघडण्यात येणार आहेत. तसंच आता घराबाहेर पडताना मास्क घालणे देखील बंधनकारक आहे. अन्यथा पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.

लॉकडाऊन मध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने कलम 188 अंतर्गत तब्बल 464 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मार्च महिन्यापासून नियम मोडणाऱ्यांविरोधात एकूण 3634 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कालपर्यंत 2850 जणांना अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.