मुंबई: Wockhardt, Jaslok पाठोपाठ Hinduja Khar, Spandan, Breach Candy, Bhatia Hospital मध्ये मेडिकल कर्मचार्‍यांना कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रूग्णांसाठी नियमित सेवा बंद
Hospital Isolation Ward | Representational Image (Photo Credits: PTI)

मुंबई शहरामध्ये झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसने आता झोपडपट्टीपासून उच्चभ्रू परिसरातील हॉस्पिटलमध्येही प्रवेश केला आहे. मुंबईत मागील आठवड्यात Wockhardt, Jaslok हॉस्पिटलमध्ये नर्ससह काही मेडिकल स्टार्फला कोरोनाचा संसर्ग झाल्याने हॉस्पिटलमधील काही सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता शहरात Hinduja Khar, Spandan, Breach Candy, Bhatia Hospital मध्येही कोरोना व्हायरसचा संसर्ग रूग्णांवर उपचार करणार्‍या मेडिकल स्टाफमधील काही जणांना झाल्याचं समोर आल्यानंतर आता या नामांकित हॉस्पिटलमधील नियमित रूग्णसेवा बंद करण्यात आली आहे.

दरम्यान The Indian Express च्या रिपोर्टनुसार, खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये 76 वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिकेनेही पुढील आदेशापर्यंत खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नवा रूग्ण दाखल न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या 76 वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात 14 हाय रिस्क कॉन्टॅक्स आहेत. दक्षिण मुंबईतील भाटीया हॉस्पिटल देखील बीएमसीने containment zone म्हणून जाहीर केले आहे. वॉकहार्ट मधील एक रूग्ण भाटीयात दाखल केल्यानंतर तेथील 45 कर्मचार्‍यांना क्वारंटीन करण्यात आलं आहे. भाटीयामध्ये रूग्णाला दाखल करताना तो कोव्हिड 19 पॉझिटीव्ह नव्हता मात्र काल रात्री खबरदारीचा उपाय म्हणून त्याची चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मुंबई: जसलोक हॉस्पिटल मध्ये नर्स आणि रूग्ण कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट आल्याने OPD Services, नव्या रूग्णांची भरती तात्पुरती स्थगित.

मागील आठवड्यात Wockhardt, Jaslok सोबत चेंबुरचं साई हॉस्पिटल, मंगळवारी (7 एप्रिल) ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल देखील containment zone अंतर्गत जाहीर करण्यात आलं. containment zone च्या भागात सामान्यांमध्ये संसर्ग पसरू नये यासाठी लोकांना आत-बाहेर करण्याची परवानगी नसते. दक्षिण मुंबईमध्येही अनेक हॉस्पिटल्स बंद करण्यात आल्याने आता आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी फार थोडे पर्याय नागरिकांकडे उपलब्ध आहेत. मुंबई शहरात सुमारे 65 वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आहेत. यामध्ये डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ सह चतुर्थ क्षेणीतील कर्मचारीदेखील आहेत. COVID 19: कोरोना बाधित 70 वर्षीय रुग्णाच्या संपर्कात आल्याने Wockhardt हॉस्पिटलच्या Healthcare विभागातील कर्मचाऱ्यांना व्हायरसची लागण

मुंबई शहरात कोरोनाबाधितांचा आकडा हा 748 पर्यंत काल नोंदवण्यात आला आहे. यापैकी 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई शहरात दिवसगणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.