COVID 19: कोरोना बाधित 70 वर्षीय रुग्णाच्या संपर्कात आल्याने Wockhardt हॉस्पिटलच्या Healthcare विभागातील कर्मचाऱ्यांना व्हायरसची लागण
Coronavirus in India | Representational Image (Photo Credits: PTI)

दक्षिण मुंबई (South Mumbai) येथे स्थित वोकार्ड हॉस्पिटल (Wockhardt  Hospital) येथील हेल्थकेअर विभागातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण (Coronavirus)  झाल्याची माहिती हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना एकाच रुग्णाकडून कोरोनाची बाधा झाल्याचे समजत आहे. प्राप्त माहितीनुसार, 17 मार्च रोजी वोकार्ड हॉस्पिटल मध्ये एका कार्डिअ‍ॅक अरेस्टच्या 70 वर्षीय रुग्णाला आणण्यात आले होते, काही दिवसांनी या रुग्णाची कोरोनाची चाचणी करताच त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून खबरदारीचा पर्याय म्हणून या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांची सुद्धा चाचणी करण्यात आली ज्यामध्ये  काही कर्मचारी हे कोरोना बाधित असल्याचे दिसून आले. यानंतर वोकार्ड हॉस्पिटल आणि आजूबाजूचा परिसर हा Containment Zone म्ह्णून जाहीर करण्यात आला आहे तसेच याठिकाणी संचारास कडक बंदी लगावण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रभावाखाली आलेली मुंबईतील प्रचलित रुग्णालये सील करण्यात आली होती. सैफी हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल आणि भाभा हॉस्पिटल्स मधील सेवाही काही अंशी बंद करण्यात आल्या होत्या तर चेंबुर मधील साई हॉस्पिटल पूर्णपणे सील करण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ आता वोकार्ड मध्ये सुद्धा कोरोना पसरल्याने हे हॉस्पिटल देखील कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा यावरून चिंतेचे वातावरण आहे. Coronavirus: 2 नव्या रुग्णांसह धारावी येथे 7, अहमदनगर येथे 25 कोरोना व्हायरस रुग्ण

ANI ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात सद्य घडीला कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाऱ्याच्या वेगाने वाढत आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार सध्या राज्यात 868 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत (526) असून त्यापाठोपाठ पुणे (141) आणि ठाणे (85) अशी रुग्णांची संख्या आहे.तर देशात मागील 12 तासात 354 नवे कोरोना रुग्ण आढळले असून आता कोरोनाबाधितांची संख्या ही 4421 वर पोहचली आहे. यातील पाच ज्यांच्या मृत्यूची सुद्धा नोंद झाली आहे.