Coronavirus: 2 नव्या रुग्णांसह धारावी येथे 7, अहमदनगर येथे 25 कोरोना व्हायरस रुग्ण
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

अशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी (Dharavi) परिसरात आज पुन्हा एकदा कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित 2 नवे रुग्ण सापडले. दोन्ही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. वडील आणि मुलाची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर हे दोघे राहात असलेला डॉ. बालीगा नगर ( Dr Baliga Nagar) परिसर सील करण्यात आला आहे.नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर धारावी येथील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 7 झाली आहे. यात मृत्यू झालेल्या व्यक्तिचाही समावेश आहे.

दरम्यान, मुंबईसह अहमदनगर जिल्ह्यातही अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 25 इतकी झाली आहे. यात तब्लिग जमात संपर्कात आलेल्या रुग्णांचाही समावेश आहे.

Mumbai: 2 more positive cases found in Dharavi - father & brother of the 2nd positive case here. Dr Baliga Nagar area of Dharavi has been sealed. Contact tracing of the new cases is being done. Total #Coronavirus positive cases in Dharavi now stand at 7 (including 1 death). pic.twitter.com/LP2lVkF0ZH

— ANI (@ANI) April 7, 2020

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण नव्या 4 जणांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. यातील 3 मरकजच्या संपर्कात आलेले आहेत.(हेही वाचा, मातोश्री बाहेरील कोरोनाबाधित चहा विक्रेत्याच्या बिल्डिंग मधील चार जण Qurantine; वांद्रे कलानगर परिसरात कडक बंदोबस्त)

दरम्यान, भारतातही कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसते आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 4421 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 354 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3981 इतकी आहे. आतापर्यंत 325 नागरिकांना उपचारानंतर प्रकृती सुधारल्यावर डिस्चार्ज देण्यात आला आह