देशात कोरोना व्हायरस सध्या धुमाकूळ घालत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील दिवसागणित वाढत जाणारा कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रभावामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई (Mumbai) मधील वॉकहार्ट रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने हे हॉस्पिटल सील करण्यात आले आहे. तसंच वोकार्ड हॉस्पिटल (Wockhardt Hospital) कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता या परिसरात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात येईल.
यापूर्वी कोरोना व्हायरसच्या प्रभावाखाली आलेली मुंबईतील प्रचलित रुग्णालये सील करण्यात आली होती. सैफी हॉस्पिटल (Saifee Hospital), जसलोक हॉस्पिटल (Jaslok Hospital), हिंदुजा हॉस्पिटल (Hinduja Hospital) आणि भाभा हॉस्पिटल्स मधील सेवाही काही अंशी बंद करण्यात आल्या आहेत. तसंच चेंबुर मधील साई हॉस्पिटल पूर्णपणे सील करण्यात आलं आहे. (Covid 19 चा संसर्गाच्या केस असणार्या सैफी, जसलोक, हिंदुजा, भाभा हॉस्पिटलमध्येही अंशतः रूग्णसेवा खंडित)
ANI Tweet:
Maharashtra: Wockhardt Hospital in Mumbai has been declared a containment zone after some staff at the hospital tested positive for #Coronavirus. More details awaited. pic.twitter.com/9j9bRlb6Hc
— ANI (@ANI) April 6, 2020
हॉस्पिटल्स सह कोरोनाचे रुग्ण आढळलेली ठिकाणे देखील सील करण्यात आली आहेत. वरळी कोळीवाडा, धारावी या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळल्याने या परिसरात नागरिकांना जाण्या येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4,067 झाला असून त्यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 781 रुग्ण आढळून आले आहेत. तसंच या संख्येत सातत्याने भर पडत आहे. आजच्या दिवसात राज्यात 33 नव्या रुग्णांची भर पडली आहे.