मुंबईतील उच्चभ्रु भागात असणार्या जसलोक हॉस्पिटल (Jaslok Hospital) मध्ये एका नर्स आणि रूग्णाला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आता जसलोकमध्ये ओपीडी कक्ष आणि नवे रूग्ण भरती करण्याचं थांबवल्याची माहिती समोर आली आहे. Times of India च्या रिपोर्टनुसार, जसलोक हॉस्पिटलमधून 150 स्वॅप टेस्ट घेण्यात आल्या आहेत. दरम्यान ब्लॅडर कॅन्सरचा एक रूग्ण ज्याला डायलिसिसची गरज होती तो कोरोना बाधित असल्याचं समोर आलं. या रूग्णाच्या संपर्कात आलेली नर्स देखील आता कोरोनाबाधित आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधील या नर्सच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्कात आलेली सारी मंडळी, हॉस्पिटल स्टाफ आता क्वारंटीन करण्यात आला आहे. दरम्यान सोमवारच्या मध्यरात्रीपासूनच वरळी कोळीवाडा देखील मुंबई पोलिसांनी संपूर्ण सील केला असून या भागात नागरिकांच्या येण्या-जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या भागातही सहा कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने भीती पसरली होती. Covid-19: बृहन्मुंबई महापालिकेचा निर्णय; आता GIS मॅपिंगद्वारे मिळवता येणार कोरोनाग्रस्तांच्या परिसराची माहिती.
भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1400 च्या पार गेला आहे. तर देशामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्तांमध्ये महाराष्ट्र राज्य आहे. राज्यात 320 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण असून 12 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर या आजारावर मात करून घरी जाणार्यांचाही आकडा समाधानकारक आहे. COVID-19 च्या मृतदेहांच्या अंत्यविधीबाबत BMC कडून प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक नवाब मलिक यांच्या मागणीवरुन घेण्यात आले मागे.
कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यासाठी अद्याप ठोस औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे शारिरीक स्वच्छता आणि त्यासोबतीने सोशल डिस्टंसिंग पाळून कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडायला मदत करा असं आवाहन सरकार आणि आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.