Covid-19: बृहन्मुंबई महापालिकेचा निर्णय; आता GIS मॅपिंगद्वारे मिळवता येणार कोरोनाग्रस्तांच्या परिसराची माहिती
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधीत रुग्णांच्या (Coronavirus Positive Patients) संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही (BMC) महत्वाचा निर्णय घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या भागात कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत, त्या सर्व परिसरांचे 'जीआयएस मॅपिंग' (GIS Mapping) करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ही कार्यवाही झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील ज्या परिसरांमध्ये 'करोना' बाधितांची संख्या अधिक असेल, त्या परिसरांचे नकाशे आणि संख्यात्मक माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. नागरिकांना आपली काळजी आपापल्या स्तरावर योग्य प्रकारे घेता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहेत.

कोरोना विषाणू भारतात दाखल झाल्यापासून प्रत्येक नागरिकांच्या चिंतेत भर घातली आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखो लोक या विषाणूच्या जाळ्यात अडकले असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच मुंबई महानगर पालिकेकडून संकेतस्थळाद्वारे नागरिकांना कोरोनाग्रस्तांच्या परिसराची माहिती पुरवली जाणार आहे. या माहितीद्वारे सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अधिक सजगपणे स्वतःची काळजी घेणं सोप जाणार आहे. तसेच त्या परिसरात काही आवश्यक कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांनाही अधिक सहजपणे प्रतिबंधात्मक उपाय योजना करता येऊ शकणार आहेत. देशावर कोरोना विषाणूचे संकट वावरत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकाकडून ठोस पावले उचलली जात आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असेही वारंवार सागण्यात येत आहे. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; मुंबईतील 146 परिसर सील

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 97 हजार 244 वर पोहचली आहे. यांपैकी 32 हजार 257 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 251 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 101 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 320 वर पोहचली आहे. यात 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.