विधवा पुनर्विवाहाचे (Remarriage of Widow) कारण पुढे करत भरपाई नाकारणाऱ्या विमा कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) चांगलाच दणका दिला आहे. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी विरुद्ध भाग्यश्री गायकवाड खटल्यात निकाल देताना कोर्टाने म्हटले की, विधवा पुनर्विवाह (Bombay HC On Remarriage of Widow) हा पुनर्विवाह मोटार वाहन कायद्यांर्गत नुकसानभरपाई नाकारण्याचे कारण ठरु शकत नाही. न्यायमूर्ती एस.जी. डिगे यांच्या एकल खंडपिठाने हा निर्णय दिला.
महिलेने पुनर्विवाह केल्याने तिच्या पहिल्या पतिच्या मृत्यूची भरपाई (क्लेम) देणे विमा कंपनीने नाकारले होते. शिवाय विम्याची भरपाई नाकारताना कंपनीने मोटार वाहन कायद्याकडे बोट दाखवले होते. मात्र, कोर्टाने विमान कंपनीचा युक्तीवाद फेटाळून लावत म्हटले की, विधवा महिलेने पुनर्विवाह केला म्हणून तिला पहिल्या पतीच्या मृत्यूची भरपाई नाकरता कामा नये. ती तिला मिळायलाच हवी.
कोर्टाने पुढे म्हटले की, पहिल्या पतीच्या मृत्यपश्चात नुकसानभरपाई मिळण्यासाठी महिलेने आयुष्यभर अथवा नुकसानभरपाई मिळेपर्यंत अविवाहीत अथवा विधवा राहावे अशी आपेक्षा कोणीही करु शकत नाही. तिचे वय लक्षात घेता सदर महिला पतीच्या अपगाती मृत्यूवेली त्याची पत्नी होती एवढेच कारण नुकसानभरपाई मिळण्यासाठी पुरेसे आहे. तसेच, पतीच्या मृत्यूनंतर पुनर्विवाह करून नुकसान भरपाई मिळणे निषिद्ध असू शकत नाही, असेही न्यायालयाने तीन मार्च रोजी दिलेल्या निकालात नमूद केले.
मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाच्या (एमएसीटी) च्या आदेशाला आव्हान देत इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने सुनावणी घेतली. कंपनीने अपघाता मत्यू झालेल्या गणेश गायकवाड याच्या पत्निला प्रतीवादी करण्यात आले होते.जिला कपनीने नुकसानभरपाई देणे नाकारले होते.
Remarriage of widow not ground to deny compensation to her under Motor Vehicles Act: Bombay High Court
Read more here: https://t.co/Wsd8ExtmHv pic.twitter.com/J5sj5BB3xs
— Bar & Bench (@barandbench) March 31, 2023
काय आहे प्रकरण?
प्रकरणाबद्दल थोडक्यात सांगायचे तर, महिलेचा पती गणेश हा दुचाकीस्वार म्हणून मोटारसायकलवरून जात असताना दुचाकीने भरधाव व निष्काळजीपणे चालविणाऱ्या ऑटो रिक्षाला धडक दिली. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूच्या वेळी, दावेदार-पत्नीचे वय 19 वर्षे होते. त्यानंतर तिने नुकसानभरपाईसाठी दावा याचिका दाखल केली.