Bomb Threat In Best Bus: बेस्ट बसमध्ये बॉम्ब असल्याचा धमकीचा ईमेल, नेरूळ येथून आरोपीला अटक
Best BUS WIKIMEDIA COMMANCE

Bomb Threat In Best Bus: वडाळा येथील बेस्ट बस डेपोला शुक्रवारी बेस्टच्या बसमध्ये बॉम्बचा स्फोट केल्याची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. या प्रकरणी बेस्ट बसच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर नवी मुंबईतील नेरुळ येथून एका तरुणाला पोलिसांनी अटक केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा आरोपी विद्यार्थी आहे, जो बसमध्ये चढू शकत नव्हता. म्हणून त्याने धमकीचा ई मेल पाठवला. (हेही वाचा- सावध रहा! आता घरी येणारे दूधही नाही सुरक्षित)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी वडाळा बेस्ट आगाराच्या कार्यालयात बेस्टच्या 512 क्रमांकाच्या बसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ईमेल आला होता. हा धमकीचा ई मेल मिळताच, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस यंत्रणा कामाला लागली. त्यांनी बसचे लोकेशन मिळवून घेतले. त्यानंतर बस मुंलुंडमध्ये असल्याचे समजले.

पोलिसांनी मुलंड येथे बस रिकामी केली आणि श्वान पथक आणि बॉम्ब निकामी पथकाच्या मदतीने शोध घेतला, परंतु काहीही सापडले नाही. बसमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बसमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व तपास यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. बसमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती ही चुकीची होती.

बसमध्ये गर्दीमुळे चढू नाही शकला म्हणून निराश होऊन आरोपीने बॉम्ब ठेवल्याचा इमेल पाठवला. पोलिसांनी हर्षित पानवाला असं नाव असलेल्या आरोपीला पकडले. पोलिसांनी हर्षित पानवाला विरुद्ध आयपीसी कलम 502, 505 , 506-2 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी त्याची पुढील चौकशी सुरु आहे.