Nitin Desai Suicide | Twitter

Nitin Desai Suicide: चित्रपट सुष्टीतले नितीन चंद्रकांत देशाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. कर्जत येथील एनडी स्टुडीओ मध्ये गळफास लावून आयुष्य संपवले. या संदर्भात कर्जत पोलिसांनी नितीन देशाई यांचा मृतदेह श्ववविच्छेदनासाठी पाठवला. चार डॉक्टरांच्या निर्दशना खाली बुधवारी त्याच्या मृतदेहाचा श्ववविच्छेदन प्रक्रिया करण्यात आली. पोलीसांनी दिलेल्या  प्राथमिक माहितीनुसार, नितीन देशाई यांचा मृत्यू गळफास लावल्यामुळे झाला आहे. यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जेजे रुग्णालयात करण्यात आले.

रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार डॉक्टरांच्या निर्दशनाखाली दिग्दर्शक नितीन देशाई यांच्यावर बुधवारी श्ववविच्छेदन प्रक्रिया करण्यात आली, गळफास घेतल्यामुळे नितीन देशाई यांच्या मृत्यू झाला अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली. या घटने संदर्भात पुढील चौकशी करण्यात येईल. अशी माहिती उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. कर्जत एनडी स्टुडीओत सापडलेला मृतदेह खालापूर येथील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला.  शवविच्छेदनातून आलेल्या अहवालातून, नितीन देसाई यांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे स्षट झाले आहे.  नितीन देसाई यांच्या मृत्यूची खबर मिळताच राजकिय आणि चित्रपट सुष्टीत सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडीयावरून राजकिय नेत्यांनी आणि कलाकारांनी शोक व्यक्त केला.

महाराष्ट्रातील आमदार महेश बल्दी यांनी नितीन देसाई हे आर्थिक परिस्थितीला सामोरे जात असल्याचे सांगितले. काही दिवसांपासून त्यांना आर्थिक अडचणी येत होत्या आणि याच कारणांमुळे त्यांनी आयुष्य संपवले असं महेश बल्दी यांनी सांगितले. हिंदी सोबत मराठी चित्रपट सृष्टीत ही नितीन देशाई यांच नाव होत. पोलिसांनी कर्जत स्टुडीओतील फोन, ईलेक्ट्रोनिक वस्तू जप्त केल्या आहे. सोबत स्टुडिओतील संबंधीत कर्मचारांनी देखील तपासणी साठी बोलवले आहे. नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.'1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं.