Driver Arrested | Image only representative purpose (Photo Credits: PixaBay)

बॉलीवुड (Bollywood) अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) यांच्या वाहनचालकाला मुंबई पोलिसांनी बलात्कार (Rape) आणि एमएमएस वीडियो (MMS Video) व्हायरल करणे या आरोपाखाली अटक केली आहे. अशोक असे या चालकाचे नाव आहे. एक आठवड्याहून अधिक काळ मुंबई पोलीस (Mumbai Police) अशोक याच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर मुंबई पोलिसांना अशोक याचा छडा लावण्यात यश आले आहे. डीएन नगर पोलिसांनी अशोक याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 376 ,50, 67 आणि 67A अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अशोक हा परेश रावल यांच्या पत्नी संपत स्वरुप आणि परिवारासाठी गाडी चालवत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 16 ऑगस्ट रोजी घडली आहे. जेव्हा परेश रावल मुंबईत नव्हते. पीडितेने केलेल्या तक्रारीनंतर पोलीसांनी कारवाई करत अभिनेता रावल यांच्या चालकाला अटक केली आहे. चालक अशोक याला अटक करण्यासाठी मुंबई पोलीस रावल यांच्या घरी गेले मात्र तो तेथे सापडला नाही. त्यानंतर डीएन नगर पोलिसांनी परेश रावल यांच दुसरा चालक दुर्गेश याच्या मदतीने अशोक याचा माग काढला आणि त्याला अटक केली.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, चालक अशोक हा गेली 10 वर्षे परेश रावल आणि त्यांची पत्नी संपत स्वरुप यांच्यासह कुटुंबियांसाठी गाडी चालवत असे. एका महिलेला हॉटेलवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि या प्रसंगाचा एमएमएस तयार करुन तो व्हायरल केल्याचा अशोक याच्यावर अरोप असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. (हेहीक वाचा, चूनाभट्टी: माझा पती समलैंगिक आहे, माला वेश्या व्यवसाय करायला लावतो; डॉक्टर पतीवर पत्नीचा गंभीर आरोप)

चालकाला अटक झाल्यानंतर परेश रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. प्रसारमाध्यमांतील वृत्तामध्ये म्हटले आहे की, अटक होण्यापूर्वी चालक अशोक हा गेले काही दिवस शहराबाहेर होता. त्याच्या कृत्याची परेश रावल यांच्या कुटुंबियांना कल्पना नव्हती.