ठाणे: गणपती विसर्जन घाट येथे 50 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला
Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले होते. तर आज पावसाच्या सुद्धा मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्याचे दिसून आले. परंतु याच दरम्यान आता ठाणे (Thane) येथे 50 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह पोलिसांना मंसुदा तलावाजवळील गणपती विसर्जन घाटाजवळ आढळून आला आहे. महिलेचा मृतदेह नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत महापालिकेने माहिती दिली आहे.

काल एमआरसीसी   यांनी अर्नाळाच्या समुद्रात अडकलेल्या 16 मच्छिमारांची सुखरुप सुटका करण्यात आली होती. हे सर्व मच्छिमार 70किमी अर्नाळा किनारपट्टीपासून दूर समुद्रात अडकले होते. मच्छिमारांकडील बोट खडबडीत स्थितीत आणि त्यावेळी वेगाने वारे वाहत असल्याचे ही सांगण्यात आले होते. (ठाणे: मीरा-भायंदर येथे मोडकळीस आलेल्या चार मजली इमारतीचा भाग पावसामुळे कोसळला) 

दरम्यान आज मुंंबईत कमी ते मध्यम स्वरुपातील पाउस असेल. यानुसार हवामान खात्याने मुंंबई व ठाणे जिल्ह्याकरिता पिवळा अलर्ट जारी केला होता. शुक्रवार सकाळ पासुन पाउस कमी झाल्याने मुंंबईत ठिकठिकाणी साचलेले पाणी ओसरायला सुरुवात झाल्याचे दिसून आले होते, परिणामी आज तरी रेल्वे, बस च्या वाहतुकीस अडथळा येणार नाही असा अंदाज आहे. तरीही, शहरात एनडीआरएफचे पथक सतर्क ठेवण्यात आले आहे.