ठाणे: मीरा-भायंदर येथे मोडकळीस आलेल्या चार मजली इमारतीचा भाग पावसामुळे कोसळला
Image For Representation Building Collapsed (Photo Credits-Twitter)

मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचले असून मोठी झाडे सुद्धा उन्मळून पडल्याचे दिसून आले आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे अतिधोकादायक इमारतीचे भाग कोसळत असल्याच्या घटना घडत आहेत. याच दरम्यान आता मीरा-भायंदर येथे मोडकळीस आलेल्या 4 मजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे.(Mumbai Rain Updates: दादर परिसरात इमारतीचा भाग कोसळला; शहरात अधून मधून जोरदार पाऊस, वारा Watch Video)

कोसळलेली इमारत 35 वर्ष जुनी असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु सुदैवाने इमारत कोसळल्यानंतर ती रिकामी असल्याने जीवितहानी झालेली नाही.महापालिकेने ही इमारत अतिधोकादाय असल्याची घोषणा केल्यानंतर रिकामी करण्यात आली होती. परंतु मुसळधार पावसामुळे ही इमारत अखेर खाली कोसळली आहे. (Mumbai High Tide Today: मुंबई मध्ये समुद्रात उसळल्या उंचच उंच लाटा; पावसाची संततधार सुरुच Watch Video)

मुंबईसह ठाणे, पालघर  जिह्यात मागील 2-3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच असून सततच्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. ठाण्यात  सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले तर अनेक परिसरात वॉटर लॉगिंगची समस्या निर्माण झाली. तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. पावसाचा हा जोर आजही कायम राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.