Mumbai Rain Updates:  दादर परिसरात इमारतीचा भाग कोसळला; शहरात अधून मधून जोरदार पाऊस, वारा (Watch Video)
Dadar House | Photo Credits: Twitter/ ANI

मुंबई मध्ये कालपासून जोरदार पावसासोबतच पावसालादेखील जोर आहे. अशामध्ये आज दुपारी दादर (Dadar) परिसरामध्ये एका जर्जर झालेल्या इमारतीचा भाग कोसळल्याची चित्रं समोर आली आहेत. दरम्यान ANI वृत्तसंस्थेने त्याबाबतचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. एका मोडकळलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. हा भाग कोसळून खाली पडला. त्यामध्ये काही प्रत्यक्षदर्शी असल्याचं व्हीडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

मुंबईमध्ये कालपासून जोरदार वारा आणि अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वित्तहानी झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान वायखेडे, डी.वाय पाटील स्टेडियम सारख्या स्थळांचेही प्रचंड नुकसान झाले होते. मुंबईमध्ये जोरदार पावसासह वाहणारा सोसाट्याचा वारा ही मान्सून मधील एक स्थिती  आहे. हे चक्रीवादळ नसल्याचं मुंबई हवामान खात्याचे के एस होसाळीकर यांनी म्हटलं आहे. Mumbai Traffic Route Update: मुंबईतील Pedder Road वर भिंत कोसळल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन.

ANI Tweet

मुंबई वेधशाळेने वतवलेल्या अंदाजानुसार आजही मुंबई सह पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये पाऊस बरसणार आहे. त्याबाबतचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आजही वडाळा सह अनेक सखल भागामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. अनेक ठिकणी उन्मळून पडलेले वृक्ष दूर करण्यासाठी पलिका प्रशासनाचे अधिकारी काम करत आहे.