Peddar Road closed due to wall collapse (Photo Credits: Mumbai Police/Twitter)

मुंबई (Mumbai) मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पेडर रोड (Peddar Road) येथे भिंत कोसळल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गर्दी आणि प्रवाशांच्या खोळंबा टाळण्यासाठी प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केले आहे. दक्षिण मुंबईतील प्रवाशांनी हाजी अली-ताडदेव रोड-नाना चौक-ओपेरा हाऊस या मार्गाचा अवलंब करावा. तर उत्तर मुंबईतील प्रवाशांनी ओपेरा हाऊस-नाना चौक-ताडदेव सर्कल-ताडदेव रोड-हाजी अली या मार्गाने प्रवास करावा अशा सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत. तसंच अनावश्यक कारणांसाठी प्रवास टाळावा असेही सांगण्यात आले आहे.

Mumbai Police Tweet:

ताज प्रेसिडेंट जंक्शनवरील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि मेकर टॉवर येथे झाडे पडल्यामुळे मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली असून अनेक कर्मचारी जागीच अडकले आहेत. कफपरेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूकीसाठी मार्ग मोकळा करण्याचे काम सुरु आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Mumbai Police Tweet:

दरम्यान आज सकाळी एन.एस. पाटकर (NS Patkar Marg) मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या भितींचा काही भाग कोसळला. त्यामुळे दोन्ही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याने अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.