Part of the retaining wall of the ridge road at NS Patkar Marg collapsed (Photo Credits: ANI)

मुंबईत (Mumbai) गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे एन.एस. पाटकर (NS Patkar Marg) मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या भितींचा काही भाग कोसळला. याचा परिणाम रस्त्यावरील दुतर्फा वाहतूकीवर झाला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. घटनास्थळी बीएमसीचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि पोलिस पोहचले असून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची चांगली दाणादाण उडाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर पत्रे उडणे, वृक्ष उन्मळून पडणे यांसारख्या घटना समोर येत आहेत.

ANI Tweet:

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नायर हॉस्पिटलचा भाग जलमय झाला आहे. याचा व्हिडिओ समोर आला असून या परिसराला नदीचे स्वरुप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत सांताक्रुझमध्ये 162.3mm तर कुलाबा येथे 331.8mm पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान आजही पालघर, मुंबई आणि ठाण्यात ढगाळ वातावरणासह पावसाची संततधार सुरु आहे. पुढील 3 तासांत मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

ANI Tweet:

मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारपट्टीकडील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.