Rains | File image | (Photo Credits: PTI)

सलग 2-3 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई (Mumbai) जलमय झालेली पाहायला मिळाली. मुंबई सह ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai) आणि राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे सलख भाग, रस्ते, रेल्वेमार्ग या ठिकाणी पाणी साचले. झाडे उन्मळून पडण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचे नुकसान झाले. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली असून राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज देखील मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील 3 तासांत मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आज पहाटे 5 पर्यंत सांताक्रुझमध्ये 146.1mm तर कुलाबा येथे 330.0mm पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान आजही पालघर, मुंबई आणि ठाण्यात ढगाळ वातावरणासह पावसाची संततधार सुरु आहे. मात्र पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

ANI Tweet:

मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार तलाव ओसांडून वाहत आहे.

मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारपट्टीकडील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

दरम्यान मुंबई आणि राज्यातील पावासाची आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आणि कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसंच मुंबईत पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली.