मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), रायगड (Raigad), पालघर कोकण आणि उर्वरीत महाराष्ट्राला आज पावसाने झोडपून काढले (Heavy Rains in Maharashtra) आहे. मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. इतर ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस धारा कोसळत आहेत. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. नद्या, नाले, ओढे ओसांडून वाहात आहेत. अशा स्थितीत राज्यात काही भागात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एकूण परिस्थिती आणि संभाव्य धोका विचारात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज प्रशासनाची एक आढावा बैठक घेतली.
मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या आढावा बैठकीत प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना केल्या. मुंबई शहरात महापालिका, महापौर, महापालिका प्रशासन, पालिका आयुक्त, पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांनी समन्वय राखावा. समन्वयाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे. वीज पुरवठा खंडीत होणार नाही. वीज पुरवठा खंडीत झाला तर लगेच तो पूर्ववत होईल. वृक्ष उन्मळने, पडने, साचलेल्या पाण्यांचा निचरा करणे यावर तातडीने कारवाई करावी असे निर्देश दिले. ठिक ठिकाणी मेट्रोची कामे सुरु आहेत. त्यामुळे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनीही सतर्क राहावे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करावेत असे मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Rain Updates: मुंबईत मुसळधार पाऊस, महालक्ष्मी रेसकोर्स, जेएनपीटीसह अनेक ठिकाणी तुडुंब पाणी, रेल्वे ठप्प, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक)
CM Uddhav Balasaheb Thackeray also reviewed the situation with district collectors of Ratnagiri, Sindhudurg, Palghar, Kolhapur, Thane and Raigad districts as they have been experiencing heavy rainfall.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 5, 2020
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीची स्थिती विचारात घेऊन कोल्हापूर, सांगली परिसरात पूरजन्य स्थिती उद्भवल्यास योग्य ती खबरदारी घेण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. सतेज उर्फ-बंटी पाटील यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. या वेळी एनडीआरएफ, यांत्रिक बोटी आणि प्रशासन आणि लोकप्रितनिधी यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, मुसळधार पाऊस कोसळत आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि मदतीसाठी सरकार खंबीर आहे. प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करु नये. सुरक्षित ठिकाणी थांबावे. तसेच, शक्यतो अतिमहत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे अवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.