Marathi Signboards on Stores: मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर मुंबई महापालिका करणार कारवाई

मुंबई महापालिका दुकानांवरील मराठी पाट्यांच्या (Marathi Signboards on Stores) मुद्द्यावरुन कडक कारवाई करणार आहे. दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याबाबत राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने आणि मुंबई महापालिकेनेही (BMC) दुकानदार आणि संबंधित अस्तापनांना वेळ दिला होता.

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|
Marathi Signboards on Stores: मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर मुंबई महापालिका करणार कारवाई
Marathi Signboards | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महापालिका दुकानांवरील मराठी पाट्यांच्या (Marathi Signboards on Stores) मुद्द्यावरुन कडक कारवाई करणार आहे. दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याबाबत राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने आणि मुंबई महापालिकेनेही (BMC) दुकानदार आणि संबंधित अस्तापनांना वेळ दिला होता.  मुदत देऊनही जर दुकानांवर नावांच्या पाट्या मराठीत दिसल्या नाहीत तर त्यांवर आता कारवाई केली जाणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील मुख्य रस्ते , जंक्शन्सवरील शोरूम्स आणि स्टोअर्स, ज्यावर मराठीचे फलक प्रामुख्याने दिसत नाहीत, त्यांच्यावर प्राधान्याने कारवाई केली जाईल.

दुकानांवरील नावांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी 31 मे ची अंतिम मुदत निश्चित केलेल्या नागरी संस्थेने आता पथके तयार केली आहेत आहेत. जी संपूर्ण शहरातील सर्व दुकानांवरील डिस्प्ले बोर्डची वैयक्तिकरित्या तपासणी करतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 10 जूनपासून या दुकानांमध्ये काम करणाऱ्या प्रति व्यक्ती 2,000 रुपये दंड ठोठावला जाईल. (हेही वाचा, Marathi Nameplates on Shops: मुंबईत सर्व दुकानांवरील पाट्या मराठीतच, Liquor Shop वर महापुरुष, गड-किल्ल्यांच्या नावांना बंदी, नियमावली जाहीर)

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (रोजगाराचे नियमन आणि सेवा शर्ती) (सुधारणा) अधिनियम, 2022 मधील दुरुस्तीनुसार, सर्व दुकानांवर देवनागरी लिपीत मराठी साइनबोर्ड प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. दुकानांवरील नावाच्या पाटीवर एकापेक्षा जास्त भाषांमध्ये नावे असतील तर त्यातील मराठी, देवनागरी लिपीतील नाव हे ओळखता येऊ शकेल असे आणि सर्वात मोठ्या ठळक अक्षरात असायला हवे. त्यानंतर इतर भाषांतील नावे ही छोट्या आकारत असतील तर चालू शकेल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश आकार आणि परिसर विचारात न घेता कपड्यांचे दुकान, किराणा माल, कार्यालये, रेस्टॉरंट, बार आणि चित्रपटगृहांसह सर्व प्रकारच्या दुकानांवर बंधनकारक आहे.

नियम पाळण्यात जर कोणी दिरंगाई केली तर मुंबई महापालिका मुख्य रस्ते आणि संबंधित अस्तापणांवर कारवाई करेल. नियमाची माहिती करुन देण्यासाठी आम्ही शोरूमच्या मालकांशी बैठका घेतल्या आहेत. दुकानदारही आदेशाचे पालन करण्यास इच्छुक आहेत. काही छोट्या दुकानांना बोर्ड बदलण्यासाठी थोडा वेळ लागेल, परंतु मोठ्या शोरूममध्ये कोणतीही अडचण असणार नाही. त्यामुळे अशा मोठ्या दुकानांवर कारवाई करण्यापासून आम्ही सुरुवात करणार आहोत, असे बीएमसीचे उपमहापालिका आयुक्त संजोग काबरे यांनी सांगितले.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change