Covid-19 Vaccination in Mumbai: BMC खुल्या मैदानात सुरु करणार drive-in लसीकरण केंद्र; येथे पहा संपूर्ण यादी
Covid-19 Vaccination | Representational Image | (Photo Credits: IANS|File)

कोविड-19 (Covid-19) च्या वाढत्या प्रादुर्भावात लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र (Drive-in COVID-19 Vaccination Centers) ही नवी संकल्पना मंगळवारपासून अंमलात आणली. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ही केंद्र उभारण्यात आली असून त्याचा त्यांना चांगला फायदा होईल. यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी लांब रांगेत ताटकळत उभे राहण्याची आवश्यकता नाही. ड्राईव्ह-इन द्वारे गाडीत बसूनच नागरिकांना लस घेता येईल.

सुरुवातीला दादरच्या कोहिनूर टॉवरच्या पार्किंग लॉटमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले होते. हे केंद्र विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सुरु करण्यात आले होते. यात एका द्वाराने प्रवेश करुन गाडीत बसूनच लस दिली जात होती. त्यानंतर दुसऱ्या दाराने बाहेर पडायचे अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर कोहिनूरमध्ये वॉक-ईन लसीकरण देखील सुरु होते. 45 वर्षांवरील लाभार्थी यात सहभागी होऊ शकत होते. दरम्यान, बीएमसीने आता ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्रात वाढ केली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची प्रक्रीया आता अत्यंत सोपी होणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि विशेषत: दिव्यांग व्यक्तींसाठी अशा प्रकारे लसीकरण मोहिम राबवली जावी, असे निर्देश पालिकेने सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. (COVID Vaccination In Mumbai: मुंबई मध्ये लवकरच सोसायट्यांमध्येच थेट मिळणार कोविड 19 ची लस; 'या' असतील अटी!)

BMC चे निर्देश:

1. महापालिकेने सर्व विभागीय उप महानगरपालिका आयुक्तांना प्रत्येक प्रशासकीय विभागात 24 तासाच्या आत एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

2. ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र मोठ्या खुल्या मैदानात सुरु करण्यात यावीत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे: अंधेरी स्पोर्ट्स क्लब मैदान, सहकार मैदान, शिवाजी स्टेडियम, ओव्हल मैदान, ब्रेबौमे स्टेडियम, एमआयजी मैदान, एमसीए मैदान, रिलायन्स जिओ गार्डन, वानखेडे स्टेडियम, संभाजी उद्यान (मुलुंड), सुभाष नगर मैदान (चेंबूर), टिळक नगर मैदान (चेंबूर), घाटकोपर पोलिस मैदान, शिवाजी मैदान (चुनाभट्टी) इ.

3. रस्त्यावरील वाहनांची कोंडी टाळण्यासाठी लसीकरण केंद्रातच वाहनांसाठी सिंगल लेन बॅरिकेट्स आणि इनलेट/आउटलेट नियंत्रण इत्यादी व्यवस्था करण्यात यावी.

4. लसीकरण केंद्रात लस देणाऱ्या कर्मचार्‍यांना बसण्यासाठी पुरेशी आणि योग्य सोय, एईएफआय, रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था असावी. (Covid-19 Vaccination in Maharashtra: कोविड-19 लसीचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल)

5. मोबाईल टॉयलेट्स आणि पिण्याच्या पाण्याची योग्य सोय केंद्रावर असणे आवश्यक आहे.

6. केवळ 'या' नागरिकांना ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्रात लस घेण्याची परवानगी असेल

a) 60 वर्षांवरील कोविडशिल्ड लसीचा डोस घेण्यासाठी येणारे नागरिक.

7. लस लाभार्थी नागरिकाने स्वत: ची गाडी चालवू नये. एईएफआयशी संबंधित कोणत्याही वाहनात लाभार्थी व्यक्तीसोबत वाहनचालक किंवा इतर कोणी असणे गरजेचे आहे.

ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्रांचा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना नक्कीच फायदा होईल. यापूर्वी लसीकरण केंद्रावर झालेली गर्दी आणि ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय आपण पाहिली. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावात हे चित्र टाळण्यासाठी ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र नक्कीच फायदेशीर ठरतील.