Fire | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबई (Mumbai) शहरात उभा राहात असलेल्या तीन मजली गगनचुंबी इमारतींना लागणाऱ्या आगी आव्हान ठरत आहेत. अनेकदा या इमारती इतक्या उंच असतात की तिथपर्यंत अग्निशमन दलाला पोहोचेपर्यंत बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असते. अनेकदा काही प्रकरणांमध्ये जीवीत हानीही होते. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. मुंबई महापालिकेने आता एक नवा नियमच केला असून तो पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांवर सक्तीही करण्यात येत आहे. या नियमानुसार मुंबईतील इमारतींना आता अग्निसुरक्षा नियमांची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे. या पुढे मुंबई पालिका हद्दितील सोसाटीचे नुतणीकरण अधवा नोंदणी करताना अग्निसुरक्षा अहवाल (Fire Safety Report) सादर करणे बंधनकारक असणार आहे. उपनिबंधक, सहकारी संस्था नोंदणी कार्यालयाला नियमात तरतूद करण्याबाबत महापालिकेने पत्र दिले आहे.

पाठिमागील वर्षांमध्ये मुंबईतील इमारतींना आगी लागण्याच्या अनेक घटना घडल्या. या घटनांमध्ये एक समान सूत्र होते. हे सूत्र म्हणजे आगी लागलेल्या बहुतांश इमारतींची अग्निशमन यंत्रणा बंद होती. तसेच, अनेक इमारतींनी त्यांची अग्निसुरक्षा पडताळणीच करुन घेतली नव्हती. तसेच, त्याबाबतचा अहवालही त्यांच्याकडे नव्हता. दहा पेक्षा अधिक मजले असलेल्या इमारतींचु मुंबईतील संख्या हजारोंच्या घरात आहे. 15 ते 15 मजल्यांपेक्षाही अधिक प्रमाणावर मजले असलेल्या सोसायट्यांची सख्या तर पाच हजारांच्याही वर आहे. त्यामुळे या इमारतींना आगी लागल्यास त्या आटोक्यात आणताना मर्यादा येतात. पाठीमागील 10 वर्षांमध्ये मुंबईतील उत्तुंग इमारतींना लागलेल्या आगींचा आकडा हा 1500 पेक्षाही अधिक आहे. (हेही वाचा, Delhi Fire: मुंडका मेट्रो स्टेशनजवळ लागलेल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार 10 लाखांची भरपाई, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिले चौकशीचे आदेश)

मुंबईतील इमारतींना वारंवार लागणाऱ्या आगी आणि त्याचे वाढते प्रमाण पाहता महापालिकेने आता नियमच केल आहे. या नियमानुसार इमारतींचे मालक, भोगवाटाधारक अथवा व्यवस्थापन यांनी इमारतीत सक्षम अग्निशमन यंत्रणा असल्याची पडताळणी करुन घ्यावी. तसा अहवाल संबंधित कार्यालयात जमा करावा. या सोसायट्या अथवा इमारतींनी दर सहा महिन्यांनी फायर ऑडिट करुन घ्यावे. तसेच त्याता अहवालही सादर करण बंधनकारक आहे. महत्त्वाचे म्हणजे सोसायटी नूतनीकरण करताना अग्निसुरक्षा अहवालही सादर करण्यात यावा असेही या नियमात म्हटले आहे.