BMC Election 2022 Fresh Ward Reservation List: यशवंत जाधव, राखी जाधव, विश्वनाथ महाडेश्वर यांचे वॉर्ड्स ओबीसी आरक्षणात; दिग्गजांना करावी लागणार इतरत्र शोधाशोध
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकांसाठी (BMC Election 2022)आज (29 जुलै) नव्याने वॉर्ड आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने राजकीय ओबीसी आरक्षण (OBC Reservation) जाहीर केले असल्याने त्यानुसार नव्याने वॉर्ड आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आजच्या यादीमध्ये बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, राष्ट्रावादीच्या राखी जाधव आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना फटका बसला आहे. ओबीसी आरक्षणामुळे या दिग्गजांना आता दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे.

SC, ST प्रवर्गाचे आरक्षण वगळता आज 236 पैकी 219 वॉर्ड्सची आरक्षण लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. 219 पैकी 63 प्रभाग हे ओबीसी आरक्षित झाले आहेत. तर सर्वसाधारण 157 प्रभागांपैकी 77 प्रभाग महिला आरक्षित होतील. नक्की वाचा: OBC Reservation: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 367 जागांवर ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणूका; सर्वोच्च न्यायालयाने नव्या अधिसूचना देण्यास निवडणूक आयोगाला रोखलं .

BMC निवडणूकांसाठी ओबीसींसाठी आरक्षित वॉर्ड कोणते?

3, 7, 9, 12, 13, 27, 30, 38, 40, 42, 48, 51, 53, 62, 76, 79, 81, 87, 89, 101, 110, 117, 128, 129, 132, 135, 137, 146, 147, 148, 150, 152, 154, 155, 159, 161, 164, 174, 179, 180, 183, 185, 188, 195, 200, 202, 203, 217, 218, 222, 223, 230, 236

ओबीसी आरक्षणामध्ये राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांचा 130 नंबरचा वॉर्ड खुल्या वर्गातून ओबीसी साठी गेला आहे. शिवसेनेच्या माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांचा 185 नंबरचा वॉर्ड ओबीसी महिला आरक्षित झाला आहे. तो देखील आधी खुल्या वर्गात होता. यशवंत जाधव यांचा वॉर्ड 217 ओबीसी महिला आरक्षित झाला आहे. तर माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर

यांचा 96 नंबरचा वॉर्ड ओबीसी महिला आरक्षित झाला आहे.