आमदार राम कदम ((Photo Credit: ANI)

हैदराबादमधील महानगरपालिकेची निवडणूक असली तरी ती निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली होती. हैदराबाद महानगरपालिकेच्या 150 जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत टीआरएसला 55, भाजपला 48, तर, असदुद्दीन औवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया एमआयएम पक्षाला 44 जागेवर विजय मिळवता आला आहे. या निकालानंतर भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई महानगरपालिकेवरदेखील (BMC Election 2021) भाजपचा (BJP) झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला बिहार विधानसभा निवडणुकीत मिळावला. त्यांनंतर हैदराबाद महानगरपालिकेत ज्या प्रकारे भाजपला यश मिळाले आहे. यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेचा किती विश्वास आहे, हे दिसून येत आहे. जनतेनी विकास स्वीकारला आहे. यामुळे अगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीत भाजपचाच भगवा फडकणार. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या 30 वर्षांच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. कोरोना काळातही जो निष्काळजीपणा करण्यात आला, तो लोकांच्या लक्षात आहे. आम्हाला विश्वास आहे मुंबई पालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार," अशा आशयाचे राम कदम यांनी ट्विट केले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं समृद्धी महामार्गाचं काम सुरु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राम कदम यांचे ट्विट-

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2017 मध्ये शिवसेनेने बाजी मारली होती. या निवडणुकीत 227 जागांपैकी शिवसेनेला 84 आणि भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेस पक्षाला 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागेवर विजय मिळवला आहे. दरम्यान, 14 जागा इतर पक्षाला मिळाल्या होत्या.