मुंबई (Mumbai) शहरात वाढत असलेली कोरोना (Corona) आणि ओमायक्रोन (Omicron) संक्रमितांची संख्या पाहता चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाऊन नये यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासन शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Mumbai Lockdown) लावणार का? असा प्रश्न विचारला जातो आहे. या प्रश्नाबाबत सर्वसामान्य मुंबईकरांपासून सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण त्याचा थेट परीणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानावर होणार आहे. मुंबईचे पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (Dr. Iqbal Singh Chahal)) यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. चहल यांनी सांगितले की, मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढते आहे. दैनंदिन आढळणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 80% रुग्ण हे ओमायक्रोन (Mumbai Lockdown & Corona, Omicron Update) संक्रमित असल्याचेही चहल म्हणाले.
इकबाल सिंह चहल यांनी पुढे बोलताना सांगितले की, मुंबई शहरातील कोरोना बाधितांचा दैनंदिन आकडा जर 20 हजारांच्या घरात पोहोचला तर शहरात लॉकडाऊनसारखी कठोर पावले उचलावी लागतील. आर्थिक राजधानीचे शहर असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी अधिकाधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगतानाच सध्यास्थितीत प्रतिदिन आढळणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये 80% लोक हे ओमायक्रोन संक्रमित असल्याचेही चहल म्हणाले. (हेही वाचा, Corona Virus Update: भिवंडीतील एका आश्रमशाळेतील 28 विद्यार्थ्यांसह 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह)
मुंबई शहरात आजघडीला सुमारे 30 हजार बेड उपलब्ध आहे. त्यामुळे जर तशी स्थिती निर्माण झालीच तर त्याला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत याबाबत चर्चा झाली आहे. कठोर निर्बंध लागू करण्याबाबत सध्यातरी कोणताही विचार नाही. मात्र, जर येत्या काळात शहरात 20 हजार पेक्षा अधिक रुग्ण प्रतिदिन आढळू लागले तर मात्र लॉकडाऊनबाबत विचार करावा लागेल, असे चहल म्हणाले. या वेळी आगोदरप्रमाणे केवळ पॉझिटीव्ही दर पाहिला जाणार नाही तर प्रत्यक्षात रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण किती आहे हेही तपासून पाहिले जाईल. त्यानुसारच निर्णय घेतला जाईल, असे चहल म्हणाले.