मढ, मार्वे अवैध स्टुडिओ प्रकरणी BMC कडून महापालिका उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती
BMC (File Image)

मढ, मार्वे अवैध स्टुडिओ प्रकरणी BMC कडून महापालिका उपायुक्त हर्षद काळे (Harshad Kale) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. बीएमसीचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी या समितीची स्थापना केली असून या समितीला आपला अहवाल 4 आठवड्यांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिलेल्या आरोपानुसार, मढ, मार्वे मध्ये 49 फिल्म स्टुडिओ मध्ये कथित भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणी त्यांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना

कॅबिनेट मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधल्याचा आरोप केला आहे तसेच यामध्ये CRZ आणि NDZ च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला जात आहे.

बनावट कागदपत्रं, खोट्या परवानगीच्या मदतीने हजारो चौरस मीटर जागेवर अनधिकृतपणे स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये बीएमसी आणि एमसीझेडएमए (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी)च्या अधिकाऱ्यांसोबतही संगनमत असल्याचा दावा करण्यात आला आहे.