Devendra Fadnavis | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात अखेर सत्ता स्थापन झाल्याने राष्ट्रपती राजवट संपली आहेत. तसेच पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fad यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र या सत्ता स्थापनेत एक नवा ट्विस्ट पहायला मिळाला आहे. कारण भाजप सोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत राजकरणात कधीच राष्ट्रवादी पक्षासोबत भाजपने सत्ता स्थापन केली नाही आहे आणि यापुढे सुद्धा त्यांच्यासोबत युती करणार नाही असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले आहे.

राज्यात सत्ता स्थापनेचे नवे समीकरण पहता सर्व जनतेच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. तसेच अजित पवार यांचा भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय वैयक्तिक असल्याचे विधान शरद पवार यांनी केले आहे. तर दुसऱ्या बाजूला फडणवीस यांनी राष्ट्रवादी सोबत आम्ही कधीच युती करणार नाही. युती करण्याबाबत सर्व अफवा आहेत. ऐवढेच नाही तर विधानसभेत आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे घोटाळे सुद्धा उघड केले त्यावेळी अन्य मंडळींनी मौन धरल्याचे फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे.(मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्ता कोंडी फुटण्यावर स्पष्टीकरण)

मुख्यमंत्री पदाची अधिकृतरित्या शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले आहे की, आम्हीला स्पष्टपणे जनादेश देण्यात आला होता. परंतु शिवसेनेने या जनादेशाचा आदर न करत आमच्यासोबत युती तोडली आणि दुसऱ्या पक्षांसोबत सत्ता स्थापनेचा वारंवार प्रयत्न केला. तसेच महाराष्ट्रात स्थिर आणि स्थाई सरकार हवे असे ही फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवे सरकार काम करणार असल्याचे विधान फडणवीस यांनी म्हटले आहे.