Lok Sabha Elections 2019: राज ठाकरे - शरद पवार यांच्या राजकीय जवळकीवर आशिष शेलार यांचं टीकास्त्र; 'शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे' असल्याचा उल्लेख

मागील काही दिवसांपासून आशिष शेलार ट्विटरवर चांगलेच अ‍ॅक्टीव्ह झाले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाचा उल्लेख टाळत त्यांनी काही खास ट्विट लिहली आहेत.

Lok Sabha Elections 2019: राज ठाकरे - शरद पवार यांच्या राजकीय जवळकीवर आशिष शेलार यांचं टीकास्त्र; 'शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे' असल्याचा उल्लेख
Ashish Shelar and Raj Thackeray (Photo Credits: Twitter)

भारतामधील लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Election)आता महिन्याभराहूनही कमी दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या नाराजीनाट्यामुळे अनेकांचे पक्षांतर सुरू आहे. कुठे पडद्यामागे छुपी युती सुरू आहे तर कुठे राजकारणातील घराणी वर्षानुवर्षांची पक्ष निष्ठा मोडीत काढत दुसर्‍या पक्षामध्ये प्रवेश करत आहे. मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील याच गोष्टीवरून कॉंग्रेस - राष्ट्रवादीसह (Congress-NCP) राज ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यामातून निशाणा साधला आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणूकीदरम्यान राजकीय धुराळा उडणार हे नक्की! मागील काही दिवसांपासून आशिष शेलार ट्विटरवर चांगलेच अ‍ॅक्टीव्ह झाले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाचा उल्लेख टाळत त्यांनी काही खास ट्विट लिहली आहेत.Lok Sabha elections 2019: राज ठाकरे करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अप्रत्यक्ष प्रचार?

राज ठाकरेंवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामधील मागील काही दिवसंपासून वाढत असलेली जवळीक आणि मनसेचा 'मोदी -शहा मुक्त भारत' चा नारा भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. यावरून आशिष शेलारांनी राज ठाकरेंना टोला लगावत "शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे" अशा शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाला साथ द्यायला नको - नितिन गडकरी)

कॉंग्रेस - राष्ट्रवादी पक्षावर टीका

26 मार्चला शरद पवार यांनी लोकसभा निवडणूकांमधून पाय काढून घेत सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारांना संधी देण्यावरूनही आशिष शेलारांनी ख़ास ट्विट केलं आहे. यामध्ये पवारांना नातवाच्या प्रेमासमोर राजकीय धुकं असल्याचं म्हटलं आहे. तर चौकीदारच्या साईड इफेक्ट्समुळे कॉंग्रेसला प्रदेशाध्यक्षाचं राजीनामा रचावे लागलं असल्याचं म्हटलं आहे.

मुंबईमध्ये अजूनही भाजपाच्या किरीट सोमय्यांना तिकीट मिळणार की नाही? यावर तिढा कायम आहे. सोमय्यांच्या नावाला मातोश्रीवरून विरोध असल्याचं म्हटलं जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2019 12:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).