Lok Sabha elections 2019: राज ठाकरे करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अप्रत्यक्ष प्रचार?
Mns Chief Raj Thackeray | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Lok Sabha elections 2019: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा अप्रत्यक्ष प्रचार करणार असल्याची जोरदार चर्चा प्रसारमाध्यमांतून रंगली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) या वेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, असे राज ठाकरे यांनी आगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत कोणाच्या पाठिमागे ताकद उभा करणार याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, राज ठाकरे यांच्याबाबत हे वृत्त आले आहे. अर्थात, राज ठाकरे, मनसे अथवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.

सूत्रांच्या हवाल्यने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, राज ठाकरे हे थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार नाहीत. परंतू, ज्या ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासमोर शिवसेना-भाजप उमेदवाराचे आव्हान असेल अशा ठिकाणी राज ठाकरे सभा घेतील. राज ठाकरे यांच्या मनसेला काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अनुकुल होती. मात्र, काँग्रेसने विरोध केल्याने मनसेचा आघाडीसोबतचा प्रवास सुरु होऊ शकला नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने लकसभा निवडणुकीसाठी वेगळी रणनिती आखल्याची चर्चा आहे.

दरम्यान, गेल्या काही काळात राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे जाहीर सभांमधून वाभाडे काढले आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध थेट टीकास्त्र सोडले आहे. गेल्याच आठवड्यात मुंबईत झालेल्या पक्ष कार्यकर्ता मेळाव्यातही राज यांनी पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीचा तपशील बाहेर आला नसला तरी, त्याचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. (हेही वाचा-राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाला साथ द्यायला नको - नितिन गडकरी)

मनसे विधानसभा निवडणूक कामगिरी
वर्ष निवडणू आलल्या आमदारांची संख्या
2009 12
2014 1

दरम्यान, मनसे पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर भाषणात बोलताना राज ठाकरे यांनी ही निवडणुक भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा सरकार विरुद्ध विरोधी पक्ष अशी नाहीच. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह विरुद्ध देश अशी असल्याचे म्हटले होते. तसेच, मोदी आणि शहामुक्त भारतासाठी भाजपाविरोधात मतदान करा, त्याचा फायदा कोणाला होतो याचा विचार करु नका, असे सूचक विधान करुन पक्ष कार्यकर्त्यांना एक संदेश दिला होता. त्यामुळे मनसेची ताकद कोणाच्या पाठीमागे उभा राहणार हे उघड गुपीत असले तरी, उत्सुकता कायम आहे.