तत्कालीन मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते अजित पवार ( Ajit Pawar) यांच्यासोबत पहाटे पहाटे उरखलेला शपथविधी भाजप (BJP) नेत्यांच्या अद्यापही स्मरणात आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला लगावत पुन्हा एकदा या आठवणींवा उजाळा दिला. अजित पवार यांचा पायगुण अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्या पायगुणामुळेच आमची (भाजप) सत्ता गेली अशी हळहळ प्रविण दरेकर यांन व्यक्त केली आहे.
विधानपरिषद सदस्या, शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांची विधानपरिषद उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. या वेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, 'डॉ. निलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून निवड झाली आणि आमचं सरकार आलं. आता त्याच पदावर डॉ. गोऱ्हे यांना पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे.' अजित पवार यांच्या विधानावर प्रविण दरेकर बोलत होते.
या वेळी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, अजित पवार यांचा पायगुण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्या पायगुणामुळे आमची राज्यातील सत्ता गेली. प्रविण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पहाटेचा शपथविधी करुन राज्यात सत्तेवर आणलेले सरकार टीकले नाही. सत्ता गेली. सत्ता गेल्याची भावना भाजपच्या जिव्हारी लागल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. (हेही वाचा,Shiv Sena MLA Violent Against Arnab Goswami: अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर )
दरम्यान, प्रविण दरेकर यांनी या वेळी डॉ. निलम गोऱ्हे यांच्या विधानपरिषद उपसभापती पदावर झालेल्ये निवडीवर आमचा आक्षेप आहे. सरकार बहुमताच्या जोरावर हट्टपणा करत आहे. येत्या गुरुवारी या मुद्द्यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. तोपर्यंतच सरकारने निवडणूक घेतली, असेही प्रविण दरेकर यांनी म्हटले.