Nitesh Rane on Thackeray Government: 'चेक द ब्रेन' म्हणत नितेश राणे यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र
Nitesh Rane (Photo Credits: Facebook)

राज्यातील कोरोना बाधितांची दिवसागणित वाढणारी संख्या अत्यंत चिंताजनक आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधा, औषधं देखील अपुरी पडू लागली आहेत. यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यावरुन भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) निशाणा साधला आहे.

'ब्रेक च चेन' नाही तर 'चेक द ब्रेन' असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांसाठी 'चेक द ब्रेन' योग्य असल्याचे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

नितेश राणे ट्विट:

कोविड-19 रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच सार्वजनिक सुविधा केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी सुरु राहणार आहेत. तर केवळ जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कडक निर्बंधांमुळे गरीब-गरजूंना आर्थिक मदतही सरकारतर्फे करण्यात येणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी 5 हजार 476 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील लॉकडाऊनला विरोध पक्षाकडून यापूर्वीही विरोध होता. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कठोर निर्बंध घालणे आवश्यक होते. त्यामुळे अनेक सर्वपक्षीय नेते, टाक्स फोर्स, व्यापारी यांच्यासोबत झालेल्या बैठकींनंतर संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.