Nilesh Rane | (File Image)

बिहार विधानसभा निवडणुकीला (Bihar Assembly Election) अवघे काही दिवस उरलेले असल्याने सर्वत्र निवडणुकीच्या तयारीची लगबग सुरु आहे. शिवसेनाही (Shiv Sena) या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आज (गुरुवार, 8 ऑक्टोबर) शिवसेनेने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यावरुन भाजप नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये जाऊन हे स्टार प्रचारक स्वतःची उरलीसुरली पण अब्रू घालवणार, या शब्दांत निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. तसंच महाराष्ट्र सोडून ज्या राज्यांत शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यात शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील वाचले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. (Bihar Assembly Election 2020: बिहार येथे कशा होतील निवडणूका आणि किती असेल गर्दी? आयोगने दिले 'हे' उत्तर)

"ह्या स्टार कॅम्पेनर्स ना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार. महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील वाचले नाही हा इतिहास आहे," अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. (शिवसेना सज्ज! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी)

Nilesh Rane Tweet:

Nilesh Rane Tweet (Photo Credits: Twitter)

बिहार निवडणूक 3 टप्प्यात पार पडणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर या तीन दिवशी मतदान होणार असून 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना 50 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यासाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी अशा 20 जणांचा समावेश आहे.