Bihar Assembly Election 2020: शिवसेना सज्ज! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी
Shiv Sena Star Campaigners in Bihar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) मध्ये शिवसेना (Shiv Sena) 50 जागा लढवणार आहे. त्यासाठी शिवसेनेने आफल्या स्टार प्रचारकांची यादीही (Shiv Sena Star Campaigners in Bihar) जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), खासदार संजय राऊत आणि इतर 20 जणांचा समावेश आहे. बिहारमध्ये शिवसेना 50 जागा लढवेण अशी माहिती पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी या आधीच दिली होती. विशेष म्हणजे या आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने साधारण 2 लाखांच्या आसपास मते घेतली होती. काही ठिकाणी शिवसेना उमेदवार चक्क दुसऱ्या क्रमांकावर होते. तर काही ठिकाणी पिहिल्या तिन आणि पाच क्रमांकामध्ये शिवसेना उमेदवारांची कामगीरी होती. त्यामुळे या वेळी शिवसेना अधिक जोमदार प्रयत्न करताना दिसत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना स्टार प्रचारक

 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 • आदित्य ठाकरे
 • सुभाष देसाई
 • संजय राऊत
 • चंद्रकांत खैरे
 • अनिल देसाई
 • विनायक राऊत
 • अरविंद सावंत
 • गुलाबराव पाटील
 • राजकुमार बाफना
 • प्रियांका चतुर्वेदी
 • राहुल शेवाळे
 • कृपाल तुमाने
 • सुनिल चिटणीस
 • योगराज शर्मा
 • कौशलेंद्र शर्मा
 • विनय शुक्ला
 • गुलाबचंद दुबे
 • अखिलेश तिवारी
 • अशोक तिवारी

शिवसेनेच्या बाणाचा जेडीयुला धसका

दरम्यान, बिहारमध्ये शिवसेना बाणाचा नीतीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने धसका घेतला आहे. बिहारमध्ये जनता दल युनायटेड पक्षाचे धनुष्य बाण हे अधिकृत चिन्ह आहे. त्यामुळे आमच्या मतांवर परिणाम होतो, असे सांगत जदयुने निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे बिहारमधील स्थानिक पक्ष नाहीत त्यामुळे त्यांना बाण या चिन्हावर निवडणूक लढवू देऊ नये, असे जदयुने म्हटले आहे. दरम्यान, निवडणूक आगोकडून फ्री सिम्बॉल असलेले एखादे चिन्ह शिवसेना घेईल, असे खा. अनिल देसाई यांनी या आधी म्हटल आहे. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: शिवसेना धनुष्यबाणाचा घेतला नीतीश कुमार यांनी धसका; JDU पक्षाची निवडणूक आयोगाकडे धाव)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 तीन टप्प्यात पार पडत आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या 28 ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. दुसरा टप्पा 3 आणि तिसरा टप्पा 7 नोव्हेंबरला पार पडणार आहे. सर्व टप्प्यांची मिळून एकत्र मतमोजणी 10 नोव्हेंबरला होणार आहे.