लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा लवकरच जाहीर होतील. येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका 2019 (Loksabha Elections) साठी बिगुल वाजणार आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना - भाजपा यांची युती (Shivsena - BJP Alliance) होणार का? यावर चर्चा सुरू आहे. शिवसेना (Shivsena) हिंदुत्त्वावर आक्रमक होत स्वबळाचा नारा देत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये हि युती कायम राहणार का? हा प्रश्न आहे. यामध्येच पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'युतीसाठी भाजप लाचार नसल्याचं जाहीर वक्तव्य केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता कोणती नवी समीकरण दिसणार याची उत्सुकता वाढली आहे.
Maharashtra CM Devendra Fadnavis: BJP is not helpless, yes we want alliance but for development of nation. Don't want power to go in hands of people who looted nation for long. We're trying to get into alliance but we are not helpless. BJP is the party which reached 200 from 2. pic.twitter.com/FSuOHX9m4M
— ANI (@ANI) January 28, 2019
जालना येथील भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. भाजपा कार्यकर्त्यांना संबोधताना आगामी निवडणुकींसाठी सज्ज व्हा, हिंदुत्त्वाचे पुरस्कर्ते आपल्यासोबत येतील. जे येतील त्यांच्यासोबत आणि नाही आल्यास त्यांच्याशिवाय भाजप आगामी निवडणुकांना सामोरे जातील असे मुख्यमंत्री म्हणाले. लक्ष्मणराव ढोबळे यांचा राष्ट्रवादी पक्षाला रामराम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्रात सध्या युतीवरून दोन्ही पक्षामध्ये चर्चा सुरू आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ राहील असे म्हणाले आहेत. भाजप (BJP) पक्षासोबत शिवसेना युती करणार असल्याचा प्रस्ताव केवळ अफवा असल्याचे ही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
जालन्यामध्ये आज नाद घुमूदे, कमळ फुलू दे या भाजपच्या प्रचारगीताचं उद्घाटनही करण्यात आलं.