'महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ होतो आणि राहणार'- खासदार संजय राऊत
संजय राउत (Photo Credits: PTI)

शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी (28 जानेवारी) मातोश्रीवर खासदारांच्या एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत झालेल्या मुद्यांवरुन पत्रकरांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारले असता, त्यांनी 'महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ होतो आणि राहणार' अशी भुमिका मांडली आहे. तसेच भाजप (BJP) पक्षासोबत शिवसेना युती करणार असल्याचा प्रस्ताव केवळ अफवा असल्याचे ही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत आम्ही राफेल आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे पत्रकारांना सांगितले. तर 10 टक्के EWS जनरल कॅटेगरी मधील लोकांना ज्यांचे वार्षिक उत्त्पन्न 8 लाख रुपये आहे त्यांच्यासाठी कर लागू करु नये.तसेच गरीबांवर ते गरीब असल्याचे लेबल लावले गेले असल्याने ते हटविले पाहिजे असे ही संजय राऊत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा-शिवसेना-भाजप युतीचं कसं जमवायचं? भाजपचं जालना येथे तर, शिवसेनेची शिवसेना भवनात खलबतं)

तर 2014 रोजी शिवसेना आणि भाजपने एकत्र मिळुन निवडणुक लढविली होती. महाराष्ट्रात 48 लोकसभेच्या जागांपैकी शिवसेनेला 20 जागांवर निवडणुक लढविण्यात आली होती. त्यातील 18 जागांवर शिवसेनेला विजय मिळाला होता. तसेच भाजपने 24 जागांवर निवडणुक लढविली होती आणि 23 जागांवर विजय मिळवला होता.