शिवसेना-भाजप युतीचं कसं जमवायचं? भाजपचं जालना येथे तर, शिवसेनेची शिवसेना भवनात खलबतं
What will happen to Shiv Sena-BJP alliance? | (Photo courtesy: archived, edited images)

What will happen to Shiv Sena-BJP alliance? राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचं (National Congress) तर ठरलं. हे दोन्ही पक्ष आघाडी करुनच आगामी लोकसभा (Lok Sabha Elections 2019),  विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे आता शिवसेना, भाजप यांच्या युतीचं काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. युती होणारच, असे भाजपचे नेते छातीठोकपणे सांगत असले तरी, शिवसेना नेतृत्वाने (Shiv Sena Chief) मात्र युतीबाबतचे पत्ते अद्याप ओपन केले नाहीत. त्यामुळे युतीचे वर्तनमान तरी अंधारात आहे. असे असले तरी, पडद्यापाठीमागे दोन्ही पक्षांची युतीसाठी जोरदार बोलणी सुरु असल्याची चर्चा आहे. दरम्यान, युतीचे भवितव्य ठरविण्यासाठी शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षनेतृत्वांनी पक्षांतर्गत बैठकांचा धडाका उडवला आहे. युतीबाबत पक्ष खासदारांचे मत आजमवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी खासदारांची बैठक मुंबई (Mumbai) येथे बोलावली आहे. तर, दुसऱ्या बाजूला भाजपनेही (BJP) जालना (Jalna) येथे पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश विस्तारित कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे, भाजप कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) संघाच्या देवगिरी प्रांताच्या प्रतिनिधींची सूचक बैठकही रविवारी (२७ जानेवारी ) सायंकाळी औरंगाबाद येथे पारपडली. त्यामुळे युतीचे काय होणार? हा मुद्दा पुन्हा एकदा जोरदारपणे ऐरणीवर आला आहे.

शिवसेना भवनात उद्धव ठाकरे घेणार आढावा

प्राप्त माहितीनुसार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शवसेना खासदारांची बैठक शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) येथे आज (28 जानेवारी) पार पडत आहे. या बैठकीत आगामी निवडणूक स्वबळावर लढायची की पुन्हा एकदा युती करायची? यावर चर्चा होणार आहे. युती किंवा स्वबळ याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे हेच घेणार आहेत. परंतु, शिवसेनेतील खासदारांचा एक गट युती व्हावी या मताचा आहे. काही दिवसांपूर्वीच या गटाने एका ज्येष्ठ खासदारामार्फत शिवसेनेने लोकसभा युती करुन लढावी अशी भावना उद्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली होती. दरम्यान, ज्यांना स्वबळावर लढायचे नाही त्यांनी निवडणुकच लढू नका, असा थेट इशारा दिल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या बैटकीत काय होणार याबाबत उत्सुकता आहे. त्यातच, उद्धव ठाकरे यानी 'युतीची बोलणी गेली खड्ड्यात आगोदर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा', असे विधान जाहीर सभांमधून अनेकदा केले आहे. त्यामुळे ही उत्सुकता आणखीच वाढली आहे.

आरएसच्या सूचक बैठकीला जोडूनच भाजपची जालना येथे बैठक

दरम्यान, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र प्रदेश विस्तारित कार्यकारिणीची बैठक जालना येथे पार पडत आहे. या बैठकीतही स्वबळ की युती यावर जोरदार खल होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे सर्व मंत्री, राज्यातील सर्व खासदार, सर्व आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस,प्रदेश कार्यसमितीसाठी अपेक्षित पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: आघाडीचं ठरलं, युतीचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस मिशन ट्वेंटी-20, शिवसेना-भाजप गुलदस्त्यात)

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा निर्णय कळवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी निवडणुका विधानसभा, लोकसभा एकत्र लढल्यास त्याचा भाजपला किती फायदा होऊ शकतो. तसेच, या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करावी की स्वबळावर लढावे. युती आणि स्वबळ हे निर्णय किती फायद्यात राहतील यांसाह पक्षबांधणी, बुधबांधणी यांसह निवडणुकांची रणनिती ठरविण्यासाठी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकांच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा युतीच्या चर्चेने जोर पकडला आहे. निर्णय मात्र दोन्ही पक्षाकडून किंवा दोघांपैकी एका पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया येईल तेव्हाच समजणार आहे.