दिल्लीतील जहांगीरपुरी (Jahangirpuri) भागात झालेला हिंसाचार आणि महाराष्ट्रात लाऊडस्पीकरच्या वादावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, दोन्ही राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका येणार असून भाजपकडून (BJP) निवडणुका जिंकण्यासाठी हे सर्व केले जात आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, देशातील दोन मोठ्या शहरांमध्ये ज्या प्रकारे दंगलीचे वातावरण निर्माण झाले आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. दिल्लीत महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत आणि ती निवडणूक जिंकण्यासाठी हे सर्व केले जात आहे. मुंबईतही असाच प्रकार करण्यात आला असून येथे लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
दिल्लीत महापालिका निवडणुका होणार आहेत, तर महाराष्ट्रातही बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत. दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीच्या दिवशी हिंसाचार उसळला होता, हिंसाचारानंतर सलग चौथ्या दिवशी बी भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती निश्चितच थोडी सुधारली असली तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच सुरक्षा दलांना तेथून हटवता येईल. हेही वाचा Asaduddin Owaisi Statement: दोन भावांच्या भांडणात माझे नाव का घेता? AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसींचा ठाकरेंना सवाल
शनिवारी मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर परिसरात हिंसाचार उसळला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांना अटक केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्याचा इशारा दिला होता. तसे न झाल्यास मशिदींबाहेर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा चालवा, असे सांगण्यात आले. राज ठाकरेंनी सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.