Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

भाजपचे (BJP)माजी आमदार मोहन फड (Mohan Phad) यांचा मुलगा पृथ्वीराज फड (Prithiviraj Phad) याचा गंगाखेड (Gangakhed)  जवळ दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान मुंबईहुन परभणी (Parbhani)  मध्ये आलेला पृथ्वीराज हा काल 10 जुलै रोजी गंगाखेडच्या दिशेने आपल्या बाईकवरून जात होता, यावेळी शहरातील उड्डाणपुलावर त्याच्या बाईकचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात बाईकचा सुद्धा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. अपघात होताच स्थानिकांनी पृथ्वीराज याला जवळच्या रुग्णालयात नेले मात्र तोवर बराच उशीर झाला होता. हॉस्पिटल मध्ये पोहचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुणे: कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात

पृथ्वीराज याच्या बाईकला अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. कारण ज्या अर्थी बाईकचा चक्काचूर झालाय त्यानुसार या गाडीला दुसऱ्या वाहनाची जोरदार धडक बसली असणार, ही धडक इतकी तीव्र होती की पृथ्वीराज याच्या डोक्यातले हेल्मेट सुद्धा निघून दुसरीकडे पडले होते. पण नेमका अपघात घडला कसा याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, अपघातांची माहिती मिळताच मोहन फड यांच्यासह कुटुंब तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. तरुण मुलाच्या मृत्यूने या फड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.