ठाण्याच्या (Thane) मुरबाड (Murbad) येथील भाजप नगरसेवक नितीन तेलवाने (Nitin Telavane) यांना एका महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन तेलवाने यांनी गुरुवारी मध्यरात्री एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी नितीन तेलवाने यांच्याविरूद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड येथील भाजपचा नगरसेवक नितीन तेलवाने याने काल रात्री 12.40 च्या सुमारास एका महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आज त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 452, 354, 354 (अ), 506 या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर; वनमंत्रीपदासाठी 'ही' नावे चर्चेत
अनिल देशमुख यांचे ट्वीट-
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड येथील भाजपचा नगरसेवक नितीन तेलवाने याने काल रात्री १२.४० च्या सुमारास एका महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी आज त्याला अटक करण्यात आली.त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५२, ३५४, ३५४-अ,५०६ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. pic.twitter.com/KPmTBmajRw
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 4, 2021
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेले पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. यातच हे प्रकरण ताजे असताना भाजप नगरसेवकाने एका महिलेचा विनयभंग केल्याची वृत्त समोर आले आहे.