Nagpur Bird Flu : नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेक, अंडी उबवणी केंद्रात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू; पशू संवर्धन विभाग अलर्ट मोडवर
Chicken (Photo Credits: Pixabay)

 

Nagpur Bird Flu : नागपूरमध्ये राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूचा (Bird Flu) उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत हजारो कोंबड्या बर्ड फ्लूने संक्रमीत झाल्या असून गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पशू संवर्धन विभाग (Department of Animal Husbandry) अलर्ट मोडवर आले आहे. या संबंधित योग्यती काळजी पशू संवर्धन विभागाच्यावतीने घेण्यात येत आहे. (हेही वाचा :Bird Flu FAQs: अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे का? Avian Influenza धोका माणसाला किती? जाणून घ्या बर्ड फ्लू संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे )

गेल्या काही दिवसांपासून दररोज राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. ही बाब पशू संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना समजली. त्यानंतर त्याचे कारण समजण्यासाठी तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे नमुने पुणे आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर चार मार्च रोजी कोंबड्यांच्यां मृत्यूचे कारण समोर आले आहे. कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे अहवालात सिद्ध झाले. त्यानंतर नागपूरच्या जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक यांनी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचे मान्य केले आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता योग्यती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा :Bird Flu दरम्यान मांस व अंड्यांचे सेवन कितपत सुरक्षित आहे? FSSAI ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना )

शासनाने खरबरदारी म्हणून पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्याशिवाय, तिथून काही अंतरावर असलेल्या पशु वैद्यकीय विद्यापीठाचा पोल्ट्री फार्ममधील 260 कोंबड्या ही मारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.