![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/108-93-380x214.avif?width=380&height=214)
Bird Flu in Maharashtra: महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येत आहे. बर्ड फ्लू हा इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे, जो बहुतेक पक्ष्यांना होतो. परदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संपर्कातून भारतीय पशू-पक्ष्यांमध्ये हा प्रादुर्भाव होतो. बर्ड फ्लूची बहुतेक प्रकरणे जलस्त्रोतांच्या जवळच्या भागात नोंदली गेली आहेत, जिथे स्थलांतरित पक्षी बऱ्याचदा येतात. सध्या होत असलेल्या पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण एच१एन५ विषाणूचा स्ट्रेन असल्याचे समोर आले आहे. कोंबड्या आणि पक्ष्यांबरोबरच वाघ आणि बिबट्यांनाही संसर्ग झाला आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, नागपूर, ठाणे, रायगड आणि चंद्रपूर जिल्ह्यात बर्ड फ्लूचे सात रुग्ण आढळले आहेत. कोंबड्यांबरोबरच वाघ, बिबट्या, गिधाड आणि कावळ्यांमध्येही बर्ड फ्लूची माहिती आहे. आतापर्यंत या फ्लूमुळे दोन वाघ आणि एका बिबट्यासह ६९३ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, राज्यात खबरदारी म्हणून प्रशासनाने सात हजारांहून अधिक कोंबड्यांना मारण्यात आले आहे.
आतापर्यंत लातूर, नांदेड, नागपूर, ठाणे, रायगड आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याने कोंबड्यासह वाघ, बिबट्या, गिधाड आणि कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाली आहे.
बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे चंद्रपूरात 1165 अंडी आणि 50 किलो चारा नष्ट करण्यात आला आहे. पोल्ट्री फार्मने उपाययोजना राबविल्या असून कोणताही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांच्या कोंबड्या दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात या रोगाची लागण होऊन ७१ कावळ्यांचा मृत्यू झाला. बर्ड फ्लूमुळे केंद्रात गिधाडांचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून काही दिवस चिकन खाणे टाळण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच बाहेरचे अस्वच्छ पदार्थ टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.