महाराष्ट्रात यंदा एमपीएससी (MPSC) आणि बीएड परीक्षेसाठी सीईटी (MAH B.Ed. CET 2022) अशा दोन्ही परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी आयोजित करण्यात आल्या आहेत. दरम्यान या दोन्ही परीक्षा देणार्यांना एका परीक्षेवर पाणी सोडावं लागणार का? असा सवाल घोंघावत होता. मात्र राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यावर तोडगा काढला आहे. आज विधानसभेत बोलताना त्यांनी ज्या परीक्षार्थ्यांना दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत त्यांनी सीईटी सेल सोबतसंपर्क साधावा.
सीईटी सेलमध्ये दोन्ही परीक्षा देणार्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देण्यासाठी तारीख बदलून मिळणार आहे. चंद्रकांत पाटलांच्या या मोठ्या घोषणेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीव भांड्यात पडले आहेत. नक्की वाचा: MPSC Exam Updates: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा, घ्या जाणून .
#एमपीएससी आणि बीएड #सीईटी परीक्षा एकाच दिवशी २१ ऑगस्टला होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @ChDadaPatil यांनी निवेदनाद्वारे #विधानपरिषद व #विधानसभा मध्ये दिली. pic.twitter.com/wZdZ6qwgNr
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 17, 2022
बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्टपासून 3 दिवस चालणार आहे. एमपीएससी स्टेट सर्विसेस प्रीलिम्स परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी आहे. या परीक्षेची अॅडमीट कार्ड्स वेबसाईट वर जारी करण्यात आली आहेत. त्यासाठी mpsconline.gov.in ला भेट द्यावी लागेल. प्रीलिम्स नंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी असे 3 टप्पे पार केल्यानंतर विद्यार्थ्यांना अंतिम निकाल पाहता येतो.