Bomb Threat: पत्नीच्या प्रेमापोटी पती तिला बाहेर जेवायला घेऊन जातो किंवा महागातले महाग कपडे, फॉरेन ट्रिपला घेऊन जातो. मात्र, मुंबईत एका पठ्याने विमान कंपनीची सगळी यंत्रणा अलर्टमोडवर आणल्याची माहिती समोर आली आहे. हो, तुम्ही वाचलेल खरं आहे. अशी एक घटना मुंबई विमानतळावर घडलेल्या एका घटनेतून समोर आली आहे. आपल्या पत्नीसाठी त्याने विमान कंपनीला धमकीचा कॉल (bomb threat call) केला. ज्यामुळे त्याला पोलिसांनी अटकही केली. त्याच्या या कृत्यामुळे त्याला दोन दिवसांची जेलची हवासुद्धा खावी लागली आहे. विलास बाकडे असे या पतीचे नाव आहे. ( हेही वाचा : Bomb Threat at Mumbai Airport: IndiGo Flight च्या Chennai-Mumbai विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन; तपास सुरू )
नेमकं प्रकरण काय?
विलास बाकडे पत्नीसोबत बंगळुरूला राहतो. काही कमानिमित्त त्याची पत्नी मुंबईत आली होती. आकसा एअरलाईंसच्या(Akasa Airlines) फ्लाईटने ती परत जात होती. त्यासाठी तिने तिकीट बुक केलं होतं. मात्र बंगळूरूला माघारी जात असताना तिला फ्लाईट पकडण्यासाठी उशिर झाला. तिने आपल्या पतीला फोन करत याची माहिती दिली. विलास याने पत्नीची फ्लाईट मीस होऊ नये यासाठी थेट अकासा एअरलाईन्सच्या कंट्रोल रूमला फोन केला. ( हेही वाचा :Bomb Threat: दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसह 7 विमानतळांवर बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; जयपूर विमानतळावर खळबळ )
फोनवर काय म्हणाला?
विलास बाकडे याने फोन करत विमानात चक्क बॉम्ब असल्याची धमकी दिली. अस करण्यामागे एकच उद्देश होता. ज्याने विमान चेकींगमुळे वेळ जाईल आणि पत्नीला फ्लाईट पकडता येईल. मात्र, बॉम्ब असल्याचा फोन आल्याने सगळेच हादरले. कारण त्यावेळी विमानामध्ये एकूण 167 प्रवासी होते. स्थानिक गुन्हे शाखेचे बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी आले. संपूर्ण विमानाची तपासणी केली. मात्र विमानामध्ये त्यांना काहीच सापडलं नाही. शेवटी रात्री दीड वाजता विमान बंगळुरूच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी विलास याच्या धमकीच्या फोनची माहिती दिली.
प्लाईटला उशिरा व्हावा यासाठी केलं
त्यानंतर, मुंबई पोलिसांनी बेंगळुरूमधून विलास बाकडे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस तपासादरम्यान, त्याने असं कल्याचं कबूल केलं. बायकोला पोहोचायला उशिर झाला होता, प्लाईटला उशिरा व्हावा यासाठी त्याने हा धमकीचा फोन केल्याची कबूली त्याने दिली. न्यायालयात हजर केल्यावर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आता विलास बाकडे याला जामीन मंजूर झाला आहे.