देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश वाढवले आहेत. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. तसेच ज्या गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होईल त्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर मंगळवारी वांद्रे पश्चिमेला स्थानकाबाहेर विविध समुदायाचे बहुसंख्य लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यावेळी लॉकडाउनच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. मात्र अचानक एवढ्या मोठ्या गर्दीमागे कोणाचा हात आहे याबाबत चर्चा सुरु झाली. तसेच सरकारवर सुद्धा विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यानंतर विनय दुबे याने सोशल मीडियात चिथावणी देणारी पोस्ट लिहिली होती. त्यानंतर दुबे याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर अटक करण्यात आले आहे. तसेच अन्य 9 जणांना सुद्धा वांद्रे स्थानकातील गर्दी प्रकरणी आता अटक करण्यात आले असून येत्या 19 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाच वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाउनचे आदेश कठोर केले जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला वांद्रे स्थानकातील गर्दीचे वातावरण पाहता संताप व्यक्त करण्यात आला. बहुसंख्येने जमलेल्या उत्तर भारतीयांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार सु्द्धा करण्यात आला. या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच महाराष्ट्र सायबर सेलने सोशल मीडियावरील 30 अकाउंटच्या माध्यमातून वांद्रे गर्दी प्रकरणी पोस्ट लिहिल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणाचे अधिक व्हिडिओ सुद्धा तपासले जात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्र राज्यात आज 165 नव्या रुग्णांची नोंद; राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3000 च्या पार)
Mumbai: Nine persons have been sent to police custody till 19th April, in connection with the gathering in Bandra on 14th April. #Maharashtra
— ANI (@ANI) April 16, 2020
दरम्यान, विनय दुबे याने एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करुन कामगार वर्गाला भडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विनयच्या विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साथिचा रोग पसरवण्यासाठी लोकांना एकत्र केल्याचा आरोप ही विनय याच्यावर लावण्यात आला आहे. तर विनय याला सुद्धा येत्या 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.