Coronavirus | Photo Credits: Unsplash

देशात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची व्याप्ती महाराष्ट्र राज्यात झपाट्याने वाढत आहे. दिवसागणित कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आज त्यात 165 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता 3081 वर पोहचला आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यात मुंबईचे 107 नवे रुग्ण आहेत. तर अहमदनगर-1, चंद्रपूर-1, मालेगाव-4, नागपूर- 1, नागपूर मनपा- 10, नवी मुंबई मनपा-2, पनवेल मनपा- 1, ठाणे- 3, ठाणे मनपा- 9, ठाणे जिल्हा- 1, वसई विरार मनपा-2, पिंपरी-चिंचवड- 4, पुणे- 19 असे नवीन रुग्ण सापडले आहेत.

मुंबईतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. त्यामुळे स्वाभाविकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. कोरोना व्हायरसच्या आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच कोरोना व्हायरस सोबत ओढावणाऱ्या आर्थिक संकटालाही आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी अर्थतज्ञांची टीमही उभी करण्यात आली आहे. (सर्व मुंबईकरांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याऐवजी केवळ 'या' लोकांनाच या गोळ्या देण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय)

ANI Tweet:

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 12,380 झाली असून त्यापैकी 1489 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोविड 19 च्या संसर्गाने आतापर्यंत तब्बल 414 रुग्णांचा बळी घेतला आहे. कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशाची रेड, ग्रीन आणि व्हाईट या तीन झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे.