औरंगाबाद: कोरोना विषाणूमुळे आणखी 3 रुग्णांचा मृत्यू; जिल्ह्यातील मृतांची संख्या 29 वर
Covid 19 (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रासह (Maharashtra) औरंगाबाद (Aurangabad) शहरातही कोरोना विषाणूचा विळखा वाढतच चालला आहे. औरंगाबाद येथील घाटी परिसरातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या 14 तासांत कोरोना विषाणूमुळे 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यामुळे औरंगाबाद येथील कोरोनाबाधित मृतांची संख्या 29 वर पोहचली आहे. कोरोनाबाधित असलेल्या 35 वर्षीय महिलेचा आज सकाळी 6 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच संजय नगरातील 52 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा 16 मे रोजी सायंकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, दम्याचा त्रासही होता. तर, जलाल कॉलनी येथील 32 वर्षीय पुरूष रुग्णाचा 16 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, ,अशी माहिती औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाविषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, राज्यात अद्यापही कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बदल दिसून आला नाही. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे. तसेच मृतांच्याही संख्येत वाढ होत आहे. यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- नागपूर: स्थलांतरित कामगारांचा ट्रकच्या माध्यमातून आपल्या घरी जाण्यासाठी जीवघेणा प्रवास

ट्वीट- 

औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्या भागात किती रुग्ण-

जालान नगर (1), उलकानगरी (1), रोहिदास हाऊसिंग सोसायटी (1), संजय नगर (1), सातारा परिसर (1), गणपती बाग, सातारा परिसर (6), विद्यानगर, सेव्हन हिल (1) , एन सहा,सिडको (1), पुंडलिक नगर (5), हुसेन कॉलनी (8), राम नगर (3), बहादूरपुरा (8), बारी कॉलनी, गल्ली नं. दोन (1), कबाडीपुरा, बुड्डीलेन (3), शरिफ कॉलनी (3), बाबर कॉलनी (3), सिंधी कॉलनी (1), न्याय नगर (1), न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी (1),सिल्क मिल कॉलनी (1), घाटी (1), रेंटीपुरा (1), अन्य (2) तर कन्नड तालुक्यातील देवळाणा (2) या भागातील आहेत. महत्वाचे म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यातील 255 जणांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 30 हजार 706 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 हजार 135 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 7 हजार 88 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत.