नागपूर: स्थलांतरित कामगारांचा ट्रकच्या माध्यमातून आपल्या घरी जाण्यासाठी जीवघेणा प्रवास
स्थलांतरित कामगार (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश मे महिन्या अखेर पर्यंत कायम राहू शकतात अशी चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लॉकडाउनमुळे विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना याचा मोठा फटका बसला आहे. या स्थलांतरित कामगारांचे हातावर पोट असल्याने कोणतेच उत्पादनाचे साधन लॉकडाउनच्या काळात उपलब्ध नसल्याने त्यांनी घराची वाट पकडली आहे. काही जण चक्क पायी चालत जात असल्याचे येत आहे. स्थलांतरित कामगार मिळेल त्या मार्गाने आपल्या घरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच दरम्यान, नागपूर (Nagpur) येथे सुद्धा स्थलांतरित कामगार ट्रकच्या माध्यमातून जीवघेणा प्रवास करत असल्याचे दिसून आले आहे.

ट्रकमधून जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांनी असे म्हटले आहे की, लॉकडाउनचा निर्णय जाहीर केल्यापासून आम्हाला अनेक अडचणी येत आहेत. आम्ही मास्क घालतो पण सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अशक्य होत असल्याचे ही कामगारांनी स्पष्ट केले आहे. स्थलांतरित कामगारांना आपल्या घरी सुखरुप जाता यावे यासाठी लालपरी आणि स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. परंतु स्थलांतरित कामगारांना ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करण्यापूर्वी फिटनेस सर्टिफिकेट आणि रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(Coronavirus: पुण्यात आज दिवसभरात 202 नवे कोरोनाबाधित रुग्ण)

दरम्यान, गेल्या काही दोन दिवसांपासून स्थलांतरित कामगारांसोबत दुर्दैवी अपघाताच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. स्थलांतरित कामगारांनी पायी चालत जाऊ नये असे सुद्धा आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाबाबत एकूण राज्यातील परिस्थिती पाहता अधिक गंभीर आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनच्या काळात नियमांचे पालन करावी अशी अपेक्षा केली जात आहे.