Mumbai Temperature Today: उष्णतेचा कहर! मुंबईत आज 37. 3 अंश सेल्सिअस तापामानाची उच्चांकी नोंद
Heat (Photo Credits: JBER)

मुंबई (Mumbai) गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबईत आज सकाळपासून चटके बसणार ऊन असल्यामुळे उकाडाही प्रचंड वाढला आहे. महत्वाचे म्हणजे, मुबईत आज तापमानाचा 37.3 अंश सेल्सिअसवर (Mumbai Temperature) पोहचला आहे. ही मार्च महिन्यातील उच्चांकी नोद ठरली आहे. लॉकडाऊनंतर रस्त्यावर पुन्हा एकादा गर्दी वाढू लागली होती. मात्र तीव्र उन्हामुळे आज रस्त्यांवरही शुकशुकाट दिसला आहे. त्याचप्रमाणे उद्याही मुंबईत सूर्याचा प्रकोप असाच सुरु राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कुलाबा वेधशाळेचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मंगळवारी 35 अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली होती. मात्र, आज यात दोन अंशाची वाढ झाली आहे. मध्य भारतातून वाहत येत असलेल्या शुष्क वाऱ्यांमुळे वातावरणातला उष्मा वाढला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- CSMT बनले महाराष्ट्रातील पहिले हरित रेल्वे स्थानक; IGBC कडून मिळाले सुवर्ण प्रमाणपत्र

ट्वीट-

गेल्या वर्षी मार्च महिन्यात 37. 5 अंश सेल्सिअस तापानाची नोंद झाली होती. मुंबईत उद्यापर्यंत तापमानाची हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी व्यक्त केला आहे.